वैद्यकीय प्रवेशावरील याचिका मुंबईत स्थानांतरणास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:54 PM2019-04-16T23:54:21+5:302019-04-16T23:54:58+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या डेंटल सर्जरी, एम. डी. व एम. एस. या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासंदर्भातील याचिका मुंबई येथे स्थानांतरित करण्याचा अर्ज मुख्य न्यायमूर्तींनी मंगळवारी फेटाळून लावला.

Denial of transfer of medical admission to Mumbai | वैद्यकीय प्रवेशावरील याचिका मुंबईत स्थानांतरणास नकार

वैद्यकीय प्रवेशावरील याचिका मुंबईत स्थानांतरणास नकार

Next
ठळक मुद्देअर्ज फेटाळला : हायकोर्ट मुख्य न्यायमूर्तींचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या डेंटल सर्जरी, एम. डी. व एम. एस. या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासंदर्भातील याचिका मुंबई येथे स्थानांतरित करण्याचा अर्ज मुख्य न्यायमूर्तींनी मंगळवारी फेटाळून लावला.
डॉ. आदिती गुप्ता व इतरांनी नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केल्या आहेत. राज्यात ३० नोव्हेंबर २०१८ पासून मराठा आरक्षणाचा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय (एसईबीसी) कायदा लागू झाला आहे. त्यानुसार, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील १६ टक्के जागा ‘एसईबीसी’साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. हे आरक्षण अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने या आरक्षणामधून देण्यात येणारे प्रवेश सदर याचिकांवरील अंतिम निर्णयाधीन राहतील, असा अंतरिम आदेश दिला आहे. याचिकांवर १८ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Web Title: Denial of transfer of medical admission to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.