नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळात डेंग्यूची चाचणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:30 AM2018-09-14T00:30:38+5:302018-09-14T00:31:15+5:30

डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅन्टीबायोटिक किंवा अ‍ॅन्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो, असे असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या तीन दिवसांपासून डेंग्यूची चाचणी बंद आहे. रुग्णांना बाहेरून चाचणी करण्यास सांगितले जात असून गरीब रुग्णांवर पदरमोड करण्याची वेळ आली आहे.

Dengue test stopped in Nagpur Medical College Hospital | नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळात डेंग्यूची चाचणी बंद

नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळात डेंग्यूची चाचणी बंद

Next
ठळक मुद्देतपासणीसाठी रुग्णांचे नमुने जात आहेत बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅन्टीबायोटिक किंवा अ‍ॅन्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो, असे असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या तीन दिवसांपासून डेंग्यूची चाचणी बंद आहे. रुग्णांना बाहेरून चाचणी करण्यास सांगितले जात असून गरीब रुग्णांवर पदरमोड करण्याची वेळ आली आहे.
एकीकडे सण उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे डेंग्यू गंभीर रूप धारण करीत आहे. डेंग्यू डासांची पैदास पाच एमएल पाण्यातही होत असल्याने घराघरांमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण दिसून येत आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक प्रभागावर लक्ष्य करून कीटकनाशक फवारणी, पाणी साचून असलेले टाके, ड्रम रिकामे करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचा किती फायदा होतो तो लवकरच दिसणार असला तरी तूर्तास रुग्णांची संख्या दिवसेगणीक वाढत आहे. मोठ्या संख्येत रुग्ण खासगी रुग्णालयांसह मेयो, मेडिकलमध्ये येत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मेडिकलमध्ये रोज १५ ते २० डेंग्यू संशयित रुग्ण उपचारासाठी येतात. या आजाराचे निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी महत्त्वाची ठरते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून चाचणी बंद पडल्याने रुग्णांना बाहेरून तपासणी करण्यास सांगितले जात आहे.
उपराजधानीत डेंग्यूने गाठली शंभरी
डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी घराघरांतील कूलर्स, पाण्याचे टाके, फुलदाणी, कुंड्या, टायर्समध्ये साचलेले पाणी डासांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरत आहे. अशा दूषित घरांवर कारवाईसाठी महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला आता अधिकार देण्यात आले आहे. काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्यातरी डेंग्यूवर नियंत्रण नसल्याने रुग्णांची वाढतच जात आहे. शहरात एकट्या आॅगस्ट महिन्यात ७० रुग्णांची नोंद झाली आहे. तर जानेवारी ते आतापर्यंत रुग्णांची संख्या १००वर पोहचली आहे.

Web Title: Dengue test stopped in Nagpur Medical College Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.