चार लाखांच्या बदल्यात ५९ लाखांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:22 AM2018-05-20T01:22:15+5:302018-05-20T01:22:29+5:30

चार लाख रुपयांच्या बदल्यात ६ लाख १८ हजार रुपये घेतल्यानंतर आणखी ५३ लाख रुपये वसूल करण्यासाठी अवैध सावकारांनी एका बेकरी व्यावसायिकाची ३० लाख रुपयांची जमीन हडपली. आता त्यांचे घर बळकावण्याचे प्रयत्न चालविल्याची संतापजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रभुदास मावजीभाई पटेल (रा. आंबेडकर चौक, लकडगंज) आणि अनिल भाईलाल पटेल (रा. माधव अपार्टमेंट, लकडगंज) या दोन अवैध सावकारांविरुद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला.

Demand for 59 lakhs in exchange for four lakhs | चार लाखांच्या बदल्यात ५९ लाखांची मागणी

चार लाखांच्या बदल्यात ५९ लाखांची मागणी

Next
ठळक मुद्देसहा लाख वसूल केले : ३० लाखांचा भूखंडही बळकावला : अवैध सावकारांची भाईगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार लाख रुपयांच्या बदल्यात ६ लाख १८ हजार रुपये घेतल्यानंतर आणखी ५३ लाख रुपये वसूल करण्यासाठी अवैध सावकारांनी एका बेकरी व्यावसायिकाची ३० लाख रुपयांची जमीन हडपली. आता त्यांचे घर बळकावण्याचे प्रयत्न चालविल्याची संतापजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रभुदास मावजीभाई पटेल (रा. आंबेडकर चौक, लकडगंज) आणि अनिल भाईलाल पटेल (रा. माधव अपार्टमेंट, लकडगंज) या दोन अवैध सावकारांविरुद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला.
हुडकेश्वरमधील सुदर्शननगरात राहणारे जियाउल्ला अफजल हुसेन सिद्दीकी (वय ४९) यांची १० वर्षांपूर्वी बेकरी होती. बेकरी व्यवसाय मोठा करण्यासाठी त्यांनी पटेल जोडगोळीकडून १९ जानेवारी २००८ ला चार लाख रुपये व्याजाने घेतले. कर्जखत तयार करण्याच्या बहाण्याने आरोपींनी ९ डिसेंबर २००९ ला सिद्दीकी यांच्या भूखंडांचे इंग्रजीत (जी भाषा सिद्दीकींना समजत नाही) आममुख्त्यारपत्र बनवून घेतले. त्याआधारे ३० लाख रुपयांचा सिद्दीकींचा भूखंड आरोपी अनिल पटेलने आपल्या नावे करून घेतला. त्यानंतरही आरोपींनी २०१४ पर्यंत सिद्दीकी यांच्याकडून ६ लाख १८ हजार रुपये वसूल केले. दरम्यान, आपल्या भूखंडाची कागदपत्रे सिद्दीकी यांनी परत मागितली असता, आरोपींनी त्यांना आणखी ५३ लाख रुपयांची मागणी केली. व्याजाचा हिशेब लक्षात आला नसल्यामुळे सिद्दीकींनी पटेलांना रक्कम देण्यास नकार दिला असता आरोपींनी १३ एप्रिल २०१८ ला सिद्दीकींच्या राहत्या घरावर तीन गुंड पाठविले. त्यांनी सिद्दीकींच्या घराची भिंत पाडून रक्कम दे अन्यथा घर खाली कर, असे म्हणत धमकी दिली. या प्रकरणाची तक्रार हुडकेश्वर ठाण्यात नोंदविण्यास गेलेल्या सिद्दीकी यांना त्यावेळी पोलिसांनी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.
एकाला अटक, दुसरा फरार
हतबल झालेल्या सिद्दीकी यांनी हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने आणि पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांची भेट घेतली. त्यानंतर तपासाची चके्र फिरली. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे चौकशी करून शुक्रवारी रात्री हुडकेश्वर ठाण्यात पटेल जोडगोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभुदास पटेलला रात्रीच अटक करण्यात आली. आरोपी अनिल पटेल फरार असून, तो गुजरातमध्ये गेला असल्याची माहिती आहे.
 

Web Title: Demand for 59 lakhs in exchange for four lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.