नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 08:25 PM2019-06-17T20:25:15+5:302019-06-17T20:26:41+5:30

शेतात गुरांना पाणी पाजत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढविला. त्यात त्या शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना (धानोली, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) शिवारात सोमवारी सकाळी घडली असून, हा परिसर मासोद (ता. काटोल) लगत असल्याने या भागात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

Death of a farmer in Tiger assault in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमासोद शिवारात प्रचंड दहशत : गुरांना पाणी पाजत असताना चढवला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कोंढाळी) : शेतात गुरांना पाणी पाजत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढविला. त्यात त्या शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना (धानोली, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) शिवारात सोमवारी सकाळी घडली असून, हा परिसर मासोद (ता. काटोल) लगत असल्याने या भागात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
विठोबा दसरू वडुले (६२, रा. धानोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची धानोली शिवारात अडीच एकर शेती असल्याने ते सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतात गेले होते. दरम्यान, ते गुरांना पाणी पाजत असतानाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ते दुपारपर्यंत घरी परत न असल्याने मुलगा शेषराव यांनी शेत गाठले. ते शेतात दिसत नसल्याने त्यांनी बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली. त्यात त्यांना चपला व रक्त जमिनीवर पडले असल्याचे आढळून आले. त्या आधारे त्यांनी शोध घेतला असता, विठोबा यांचा मृतदेह उंबरविहिरीत परिसरातील जंगलात आढळून आला.
माहिती मिळताच बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक गवई, सहायक उपवन संरक्षक गजानन बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वाघाने विठोबा यांच्या मानेचा लचका तोडल्याचेही आढळून आले. त्याने विठोबा यांना धानोली शिवारातून उंबरविहिरीच्या जंगलात फरफटत आणल्याचेही स्पष्ट झाले. हा परिसर काटोल तालुक्यालगत असल्याने वाघाचा या तालुक्यातील मासोद, कोंढाळी परिसरात वावर वाढला आहे. त्यामुळे या भागातही वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
जंगलात पाण्याची टंचाई
उंबरविहिरी परिसर हा बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कक्ष क्रमांक - ४९ अंतर्गत येतो. या परिसरात अडीच वर्षीय पिंकी नामक वाघिण व युवराज नामक वाघाचा वावर आहे. विठोबा यांच्यावर नेमका कोणत्या वाघाने हल्ला चढविला, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. अभयारण्याच्या या भागातील बहुतांश जलस्रोत कोरडे पडले असून, कृत्रिम पाणवठ्यांमध्येही प्यायला पाणी मिळत नसल्याने या वन्यप्राण्यांनी पाण्याच्या शोधात त्यांचा मोर्चा शेत व नागरी वस्त्यांकडे वळविला आहे. शिवाय, पिंकी व युवराजचा मासोद, घोटीवाडा व कोंढाळी परिसरात मुक्त संचार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Death of a farmer in Tiger assault in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.