नागपुरात पानटपरीखाली दबून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:02 AM2018-09-19T00:02:26+5:302018-09-19T00:03:29+5:30

मोडकळीस आलेल्या पानठेल्यात अडकलेली चप्पल काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या १२ वर्षीय मुलाच्या अंगावर पानठेला कोसळला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

The death of a child by suppress under pan tapari in Nagpur | नागपुरात पानटपरीखाली दबून मुलाचा मृत्यू

नागपुरात पानटपरीखाली दबून मुलाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देचप्पल काढणे जीवावर बेतले : खापरीतील घटनेने परिसरात शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोडकळीस आलेल्या पानठेल्यात अडकलेली चप्पल काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या १२ वर्षीय मुलाच्या अंगावर पानठेला कोसळला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. अमन आनंद लांडगे (रा. खापरी पुनर्वसन) असे मृत मुलाचे नाव आहे.
खापरीत राहणारे अमन लांडगे, वंश रॉय आणि बंटी हे तिघे आज मंगळवारी खापरी येथील एका मैदानावर खेळत होते. वंशने फेकलेली चप्पल मैदानाच्या बाजूला असलेल्या बंद अवस्थेतील मोडकळीस आलेल्या पानठेल्याच्या छतावर पडली. ती चप्पल काढण्यासाठी अमन, वंश आणि बंटी तिघेही प्रयत्न करीत होते. दरम्यान, अमन पानठेल्यात शिरला. त्याला वंश मदत करीत होता. चप्पल खाली पाडण्यासाठी त्यांनी काठीने प्रयत्न केला. ती पडत नसल्याचे पाहून त्यांनी पानठेला हलविण्यास सुरुवात केली. सडलेल्या लाकडामुळे पानठेला अमनच्या अंगावर पडला. छोट्याशा अमनच्या छातीवर मोठे लाकूड पडल्याने तो बेशुद्ध पडला. पानठेल्याखाली वंशचाही पाय अडकला. ते पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अमनला मृत घोषित केले तर वंशवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. बेलतरोडी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: The death of a child by suppress under pan tapari in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.