शैक्षणिक प्रदर्शन ‘अ‍ॅस्पायर’ प्रदर्शनात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:50 AM2018-06-09T00:50:49+5:302018-06-09T00:55:26+5:30

आयुष्यात विद्यार्थी जीवन सर्वात महत्त्वपूर्ण आहे. जीवनाला खरं वळण याच काळात मिळते. महाराष्ट्रातील नामवंत शैक्षणिक संस्था एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय निवडीचे पर्याय याच प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संस्थांनीही विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात योग्य मार्गदर्शन करावे. केवळ डिग्री नाही तर सुजाण नागरिक तयार करावेत. शिक्षण आणि करिअरचे सर्वोत्तम पर्याय उपलब्ध असल्यामुळे मनोबल वाढविण्यासाठी लोकमतचे ‘अ‍ॅस्पायर’ प्रदर्शन सर्वोत्तम असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली.

Crowd in Education exhibition 'Aspire' exhibition | शैक्षणिक प्रदर्शन ‘अ‍ॅस्पायर’ प्रदर्शनात गर्दी

शैक्षणिक प्रदर्शन ‘अ‍ॅस्पायर’ प्रदर्शनात गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देमहापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन : लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर-२०१८

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुष्यात विद्यार्थी जीवन सर्वात महत्त्वपूर्ण आहे. जीवनाला खरं वळण याच काळात मिळते. महाराष्ट्रातील नामवंत शैक्षणिक संस्था एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय निवडीचे पर्याय याच प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संस्थांनीही विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात योग्य मार्गदर्शन करावे. केवळ डिग्री नाही तर सुजाण नागरिक तयार करावेत. शिक्षण आणि करिअरचे सर्वोत्तम पर्याय उपलब्ध असल्यामुळे मनोबल वाढविण्यासाठी लोकमतचे ‘अ‍ॅस्पायर’ प्रदर्शन सर्वोत्तम असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सहाव्या लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर-२०१८ चे तीन दिवसीय आयोजन शुक्रवार, ८ जूनपासून हॉटेल सेंटर पॉर्इंट, रामदासपेठ येथे सुरू झाले. महापौरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले.
महापौर म्हणाल्या, दहावी आणि बारावीचे निकाल घोषित झाले आहेत. पाल्याला कोणते शिक्षण द्यावे, यावर पालकांसमोर अनेक समस्या आहेत. त्यांच्या शंका प्रदर्शनातून दूर होणार आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन वेळेत मिळाल्यास त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. या वेळी महापौरांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली आणि संस्थांची माहिती जाणून घेतली.
या वेळी मुख्य प्रायोजक द युनिक अकॅडमीचे (पुणे) नागपूर शाखा प्रमुख बापू गायकवाड, सह-प्रायोजक स्नेहा गु्रप आॅफ इन्स्टिट्युशन्सचे चेअरमन प्रा. रजनीकांत बोंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम शेंदरे, मेघे गु्रप आॅफ इन्स्टिट्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन उंटवाले, वंजारी ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशन्सचे संचालक डॉ. हेमंत सोनारे, स्टेट बँक आॅफ इंडियाच्या होम लोन्स व सेल्स टीमचे सहायक महाव्यवस्थापक सुहास ढोले, झोनल कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक गोविंद भनारकर, व्हीएनआयटी शाखेचे व्यवस्थापक बलवंत कुमार, जेडी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटचे संचालक अविनाश दोरसटवार, फिनसी स्कूल आॅफ एज्युकेशनचे आशुतोष नगराळे व स्टेफी निकोलस, जेनेसिस लर्निंग सेंटरच्या संचालिका विधी झा, मॅकवर्ल्ड ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझर प्रा.लि.च्या धनश्री गंधारे, लोकमतचे संचालक विंग कमांडर रमेश बोरा, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत टाइम्सचे निवासी कार्र्यकारी संपादक एन.के. नायक, निवासी संपादक गजानन जानभोर, लोकमतचे उपमहाव्यवस्थापक (उत्तर महाराष्ट्र) आसमान सेठ, लोकमतचे महाव्यवस्थापक (अंमलबजावणी) आशिष जैन, लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान, वरिष्ठ विपणन व्यवस्थापक सोलोमन जोसेफ आणि इव्हेंटचे व्यवस्थापक आतिष वानखेडे उपस्थित होते.

वैशाली बिश्वासने जिंकला टॅबलेट
लोकमत अ‍ॅस्पायर प्र्रदर्शनात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाग्यशाली सोडतीच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी नागपुरातील वैशाली बिश्वास हिने टॅबलेट जिंकला आहे.

गुणवंतांचा सत्कार
दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश आहे. सकाळी ११.३० पासून एक-एक तासाचे पाच चर्चासत्र होणार आहे.
आजचे चर्चासत्र
सकाळी ११.३० वाजता, विषय : स्पर्धा परीक्षा-एक करिअर, वक्ते बापू गायकवाड, दि युनिक अकॅडमी.
दुपारी ३.३० वाजता, सिव्हिल सर्व्हिसेस अभ्यासक्रम-करिअरसाठी उत्तम पर्याय, वक्ते धर्मेंद्र तुरकर, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस डिग्री कॉलेज.
दुपारी ४.३० वाजता, १० वी व १२ वीनंतर विविध प्रवेश परीक्षांवर मार्गदर्शन, वक्ते संतोष कारले उंडनगावकर.
सायंकाळी ५.३० वाजता, सर्वोत्तम गुण मिळविण्याचे रहस्य, प्रूडेंट नागपूर संस्था.
सायंकाळी ६.३० वाजता, १२ वी व पदवीनंतर करिअरचे पर्याय, जेनेसिस लर्निंग सेंटर. 

 

 

 

Web Title: Crowd in Education exhibition 'Aspire' exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.