दबदबा निर्माण करण्यासाठी नागपुरात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:20 PM2019-01-16T23:20:53+5:302019-01-16T23:21:35+5:30

खरबी परिसरात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी क्षुल्लक वादातून गुन्हेगार विशाल गजभिये याने साथीदाराच्या मदतीने एका युवकाचा खून केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.

For creating self pressure murder in Nagpur | दबदबा निर्माण करण्यासाठी नागपुरात खून

दबदबा निर्माण करण्यासाठी नागपुरात खून

Next
ठळक मुद्देराहुल खुबाळकर हत्या प्रकरण : लोकांमध्ये तीव्र असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरबी परिसरात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी क्षुल्लक वादातून गुन्हेगार विशाल गजभिये याने साथीदाराच्या मदतीने एका युवकाचा खून केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विशाल विनायक गजभिये (२४) त्याचा साथीदार शंटू गोपाल शील (२१) आणि साहील ऊर्फ शुभम दिलीप रायकवार (२२) याला अटक केली आहे.
मंगळवारी रात्री आरोपींनी खरबी येथील जय जलाराम नगर चौक येथे २४ वर्षीय राहुल शंकर खुबाळकर याची हत्या केली. राहुलच्या हत्येचे कारण हे १३ जानेवारी रोजी झालेला क्षुल्लक अपघात आहे. १३ जानेवारी रोजी सायंकाळी राहुलचा लहान भाऊ अमित बाईकने जात होता. वस्तीतील शुभम नावाच्या युवकाच्या वाहनाशी त्याच्या बाईकची धडक झाली. यात अमितला मार बसला. मेडिकलला नेल्यावर त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे समजले. विशाल आणि त्याचे साथीदार परिसरात चायनीज ठेला लावतात. विशाल गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे.
विशाल राहुलला त्याच्या भावाचा उपचार करणे, प्रकरण रफा-दफा करणे आणि शुभमच्या वाहनाचे झालेले नुकसानभरपाईच्या नावावर ४६ हजार रुपये मागू लागला. राहुलने त्याला पैसे देण्यास नकार दिला. राहुलच्या उत्तराने विशाल संतापला. त्याने राहुलला अद्दल घडवण्याचे ठरवले. राहुलला धडा शिकवून त्याला परिसरात आपला दबदबा निर्माण करायचा होता. घटनेच्यावेळी रात्री ९ वाजता राहुल त्याचा भाऊ राजेशसोबत जय जलाराम चौकात आला होता. विशालने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. राहुलच्या हत्येने परिसरात दहशत पसरली. नागरिक प्रचंड संतापले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, परिसरात आरोपींचा चायनीज ठेला आहे. तेथे नेहमीच असामाजिक तत्त्वांचा वावर असतो.
भावासमोरच केला खून
आरोपींनी राहुलचा खून त्याचा लहान भाऊ राजेशसमोरच केला. राजेशने भावाला वाचवण्यासाठी आरोपींना थांबवण्याचा प्रयत्नही केला. आरोपी ऐकायला तयार नव्हते. या घटनेने राजेश प्रचंड धास्तावलेला आहे. राहुल पाण्याची कॅन डिलिवरी करण्याचे काम करीत होता. तो सर्वांशीच चांगला वागत असल्याने या घटनेमुळे परिसरातील नागरिक प्रचंड संतापले आहे.

 

 

 

Web Title: For creating self pressure murder in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.