नागपुरात वाहन कर्जाच्या नावे १६ लाखांनी फसवणाऱ्यास न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 07:49 PM2017-11-10T19:49:20+5:302017-11-10T23:06:25+5:30

वाहन कर्जाच्या नावे फसवेगिरी करणाऱ्या  एका आरोपीचा पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. शिरसाट यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

A court slapped duppre of 16 lakhs in the name of auto loan in Nagpur | नागपुरात वाहन कर्जाच्या नावे १६ लाखांनी फसवणाऱ्यास न्यायालयाचा दणका

नागपुरात वाहन कर्जाच्या नावे १६ लाखांनी फसवणाऱ्यास न्यायालयाचा दणका

Next
ठळक मुद्देअटकपूर्व जामीन फेटाळला


आॅनलाईन लोकमत

नागपूर : वाहन कर्जाच्या नावे फसवेगिरी करणाऱ्या  एका आरोपीचा पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. शिरसाट यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
आरोपी मोहम्मद साजीद मोहम्मद रफिक शेख (३४)रा. आम्रपाली अपार्टमेन्ट खसाळा रोड, असे आरोपीचे नाव आहे.
प्रकरण असे की मोहम्मद साजीद, मोहम्मद रफिक नूर मोहम्मद शेख, राजेश प्रभाकर चव्हाण, माधव सुभाष बाबळसरे, चंपालाल ऊर्फ चंदूलाल प्रेमलाल शाहू , विजय गुरुप्रसाद पटेल, तुषार रमेश पाटणे आणि इतरांनी आपसात संगनमत करून थापरसन्स मोटर्स आणि स्टार मोटर्स यानावाने बँक आॅफ महाराष्टÑ आणि बँक आॅफ बडोदा या ठिकाणी बनावट खाते उघडले होते. या दोन्ही फर्मचे प्रोप्रायटर बाबळसरे याला दाखवण्यात आले होते.
२७ नोव्हेंबर २०१४ ते २१ जून २०१७ या काळात वाडी शाखेच्या विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत वाहन कर्जासाठी बनावट कागदपत्रे संलग्न करून अर्ज सादर करण्यात आले होते. या बँकेने मोहम्मद रफीक आणि मोहम्मद साजीद यांच्या संयुक्त नावे १० लाख ६५ हजार आणि राजेश चव्हाण याच्या नावे ६ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते.
या टोळीने हे चेक थापरसन्स आणि स्टार मोटर्सच्या नावे उघडलेल्या बनावट खात्यात जमा करून ही रक्कम परस्पर काढून घेऊन बँकेची फसवणूक केली.
विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक सचिन आबाजी देवतळे यांच्या तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात २१ जून २०१७ रोजी भादंविच्या ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० ब, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपवण्यात आले असता चंपालाल शाहू, विजय पटेल, राजेश चव्हाण, मोहम्मद रफिक यांना अटक करण्यात आली होती. इतर आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत. त्यापैकी मोहम्मद साजीद याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील लीलाधर घाडगे यांनी काम पाहिले.

Web Title: A court slapped duppre of 16 lakhs in the name of auto loan in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.