देशातील सर्वप्रथम डिजीटल आॅफलाईन शाळा नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:27 AM2018-10-14T01:27:29+5:302018-10-14T01:29:51+5:30

देशातील सर्वप्रथम डिजीटल आॅफलाईन शाळा होण्याचा मान कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या शाळांना मिळणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रविवारी १२ वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे ट्रस्टच्या शाळांचे डिजिटल आॅफलाईन सॉफ्टवेअरद्वारे अनावरण करण्यात येणार आहे.

Country,s first digital offline school in Nagpur | देशातील सर्वप्रथम डिजीटल आॅफलाईन शाळा नागपुरात

देशातील सर्वप्रथम डिजीटल आॅफलाईन शाळा नागपुरात

Next
ठळक मुद्देलक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील सर्वप्रथम डिजीटल आॅफलाईन शाळा होण्याचा मान कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या शाळांना मिळणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रविवारी १२ वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे ट्रस्टच्या शाळांचे डिजिटल आॅफलाईन सॉफ्टवेअरद्वारे अनावरण करण्यात येणार आहे.
कै. लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट १९९६ पासून आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी कार्यरत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संस्थेने आतापर्यंत १८,४३० आदिवासी विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षण दिले आहे. एक लाख आदिवासी विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षण देण्याचे स्वप्न डिजिटल आॅफलाईन स्कूलमुळे पुढील दोन वर्षात साकार होणार आहे. या स्वप्नामुळेच सदर ट्रस्टला हे तंत्रज्ञान विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. स्व. लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचा जन्म आमगाव जि. गोंदिया येथे झाला. लहानपणी शिक्षणाची व्यवस्था नसल्याने त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. आज या संस्थेतर्फे ६१३ एकलव्य एकल विद्यालये चालविली जात आहेत.

Web Title: Country,s first digital offline school in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.