नागपूर रेल्वेस्थानकावरील कुत्र्यांचा केला बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:52 AM2018-11-14T00:52:02+5:302018-11-14T00:58:02+5:30

नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरात मंगळवारी मोकाट कुत्र्यांना जाळी लावून पकडण्यात आले. रेल्वे प्रशासनाने महापालिकेच्या कांजी हाऊस विभागाच्या सहकार्याने हे अभियान राबविले. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी ‘कुत्रे गुरगुरतात, लाईटही बंद असतात’ या शीर्षकांतर्गत रेल्वेस्थानकावरील अव्यवस्थेकडे लक्ष वेधले होते. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होतात या वृत्ताची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन मंगळवारी महापालिकेच्या कांजी हाऊस विभागाच्या पथकास पाचारण केले. पथकाने जाळीच्या साह्याने रेल्वेस्थानकावरील कुत्र्यांना पकडले. यानंतरही ही कारवाई सुरू ठेवण्याचे आश्वासन कांजी हाऊस विभागाने रेल्वे प्रशासनास दिले.

Controlled of Dogs on Nagpur Railway Station | नागपूर रेल्वेस्थानकावरील कुत्र्यांचा केला बंदोबस्त

नागपूर रेल्वेस्थानकावरील कुत्र्यांचा केला बंदोबस्त

Next
ठळक मुद्देजाळी लावून पकडले : प्रशासनाने केली त्वरित कारवाईलोकमतचा प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरात मंगळवारी मोकाट कुत्र्यांना जाळी लावून पकडण्यात आले. रेल्वे प्रशासनाने महापालिकेच्या कांजी हाऊस विभागाच्या सहकार्याने हे अभियान राबविले. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी ‘कुत्रे गुरगुरतात, लाईटही बंद असतात’ या शीर्षकांतर्गत रेल्वेस्थानकावरील अव्यवस्थेकडे लक्ष वेधले होते. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होतात या वृत्ताची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन मंगळवारी महापालिकेच्या कांजी हाऊस विभागाच्या पथकास पाचारण केले. पथकाने जाळीच्या साह्याने रेल्वेस्थानकावरील कुत्र्यांना पकडले. यानंतरही ही कारवाई सुरू ठेवण्याचे आश्वासन कांजी हाऊस विभागाने रेल्वे प्रशासनास दिले.

लवकरच ऐकावयास मिळेल संगीत
‘लोकमत’ने नागपूर रेल्वेस्थानकावर म्युझिक सिस्टीम प्रकल्प थंडबस्त्यात पडल्यामुळे याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याबाबत रेल्वेस्टेशनचे संचालक दिनेश नागदेवे यांनी सांगितले की, रेल्वेस्थानकावर म्युझिक सिस्टीम सुरू करण्यात आली होती. परंतु काही प्रवाशांनी शास्त्रीय संगीत वाजविण्याची तर काहींनी जुनी गाणी वाजविण्याची मागणी केली होती. त्यामुळे हे संगीत आठवडाभरात बंद करावे लागले. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर स्टेशन प्रशासनाने म्युझिक सिस्टीम पुन्हा सुरू करण्याबाबत ‘डीआरएम’ मनिंदर सिंह उप्पल यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.

एस्केलेटरवर होणार कर्मचारी तैनात
‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तात एस्केलेटरजवळ एकही रेल्वे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. याबाबत स्टेशन संचालक दिनेश नागदेवे यांनी एस्केलेटरसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आल्याची माहिती दिली. सोबतच कर्मचाऱ्यांसाठी एसएमएस सिस्टीम विकसित करण्यात येत आहे. एस्केलेटरजवळ आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास एसएमएसच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जाईल. याशिवाय एस्केलेटर आॅटोचालक आणि असामाजिक तत्त्वांकडून बंद करण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. याबाबत लोहमार्ग पोलीस निरीक्षक डाबरे आणि रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांनाही जवानांची ड्युटी लावण्यासाठी सांगण्यात येणार आहे.

Web Title: Controlled of Dogs on Nagpur Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.