लोकसंख्या नियंत्रणासाठी आयोगाचे गठन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 07:05 PM2019-07-17T19:05:19+5:302019-07-17T19:06:44+5:30

वाढत्या लोकसंख्येला राष्ट्रीय आणीबाणी समजून यावर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्य करणे गरजेचे आहे. याकरिता एका आयोगाची स्थापना करण्याची मागणी राज्यसभेत खा. डॉ. विकास महात्मे यांनी शून्य तासात केली.

Constitute the Commission for population control | लोकसंख्या नियंत्रणासाठी आयोगाचे गठन करा

लोकसंख्या नियंत्रणासाठी आयोगाचे गठन करा

Next
ठळक मुद्देविकास महात्मे यांची राज्यसभेत मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढत्या लोकसंख्येला राष्ट्रीय आणीबाणी समजून यावर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्य करणे गरजेचे आहे. याकरिता एका आयोगाची स्थापना करण्याची मागणी राज्यसभेत खा. डॉ. विकास महात्मे यांनी शून्य तासात केली. डॉ. महात्मे म्हणाले की, आम्ही आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर दोन प्रकारच्या विचारधारा प्रकाशात येतात. एका विचारधारेनुसार सर्वात मोठे मनुष्यबळ भारताजवळ असून ते आपल्यासाठी मोठे यश आहे, कारण मनुष्यबळ काम करेल तर देश पुढे जाणार. दुसऱ्या विचारधारेला माझी स्वत:ची सहमती असून, वाढत्या लोकसंख्येला विस्फोटक मानल्या जाते. कारण हे कधीही फुटून नुकसान करू शकतात. आमची संसाधने, नोकरीची संधी, गरजा आणि लोकसंख्या यामध्ये संतुलन नाही. नेहमीच पाहण्यात येते की, गरीब किंवा आर्थिक स्वरूपात कमकुवत परिवारांच्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जेव्हा की त्यांच्याकडे मुलांचे पालन, शिक्षणासाठी संसाधन राहत नाही, म्हणूनच कुपोषणाचा स्तर वाढला आहे. दुसरीकडे शिक्षित परिवार आहेत, ज्यांच्याकडे संसाधन असून मुले नेहमीच एक किंवा दोन असतात. यात सामाजिक विषमता वाढत आहे. प्रत्येक तीन महिन्यात आम्ही एक इस्रायल आणि प्रत्येक सहा महिन्यात एक स्वित्झर्लंड तसेच एक वर्षात ऑस्ट्रेलिया यासारखे देश बनत आहोत, असेही ते म्हणाले.

Web Title: Constitute the Commission for population control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.