काँग्रेस ‘त्या’ नेत्यांवर ठेवणार ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:14 AM2019-03-17T00:14:18+5:302019-03-17T00:15:43+5:30

निवडणुकांच्या काळात ‘आयाराम-गयाराम’चे वारे तर वाहू लागतातच, मात्र सोबतच पडद्यामागे राहून दुसऱ्या पक्षासाठी काम करणारेदेखील अनेक जण असतात. मागील काही काळापासून गटबाजीने ग्रस्त असलेल्या काँग्रेसने अशा नेत्यांवर विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. अशा संशयास्पद नेत्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या हालचाली काँग्रेसच्या ‘खुफिया सेल’च्या माध्यमातून टिपण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Congress will keep 'those' leaders on 'Watch' | काँग्रेस ‘त्या’ नेत्यांवर ठेवणार ‘वॉच’

काँग्रेस ‘त्या’ नेत्यांवर ठेवणार ‘वॉच’

Next
ठळक मुद्देसंशयास्पद नेत्यांची यादी तयार : पक्षविरोधी काम करणे पडणार महागात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकांच्या काळात ‘आयाराम-गयाराम’चे वारे तर वाहू लागतातच, मात्र सोबतच पडद्यामागे राहून दुसऱ्या पक्षासाठी काम करणारेदेखील अनेक जण असतात. मागील काही काळापासून गटबाजीने ग्रस्त असलेल्या काँग्रेसने अशा नेत्यांवर विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. अशा संशयास्पद नेत्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या हालचाली काँग्रेसच्या ‘खुफिया सेल’च्या माध्यमातून टिपण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मागील पाच वर्षांत शहर काँग्रेसमध्ये बरेच वाद झाले. याशिवाय बरेच नेते भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्यादेखील संपर्कात आले व त्यांनी स्वत:ची कामे करवून घेतली. खुद्द भाजपाच्या नेत्यांनी सार्वजनिकपणे हे सांगितले आहे. निवडणुकांच्या काळात हे पक्षातील ‘लाभार्थी’ नेते भाजपाची मदत करण्याची किंवा पक्षातच अंतर्गत गटबाजी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच काँग्रेसने हा निर्णय घेतला असल्याचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले. ‘हायकमांड’कडूनदेखील यासंदर्भात सूचना आल्या आहेत. आम्ही एक सविस्तर यादी तयारी केली आहे. काँग्रेसच्या अंतर्गत व्यवस्थेच्या माध्यमातून या नेत्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे एक पथकदेखील येणार असून, निवडणुकीच्या काळात सर्व हालचालींवर त्यांची नजर असेल. पक्षाविरोधात काम करणाऱ्यांविरोधातील पुरावे एकत्रित करण्यात येतील व ते ‘हायकमांड’कडे पाठविण्यात येतील. ज्या कार्यकर्त्यांना अशी माहिती मिळाली त्यांनी थेट आमच्याकडे तक्रार करण्याची सूचना आम्ही दिली आहे, असे ठाकरे यांनी प्रतिपादन केले.

Web Title: Congress will keep 'those' leaders on 'Watch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.