गुजरातमध्ये काँग्रेस हरली तरी भविष्यात त्याचा फायदा होईल; पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 08:42 PM2017-12-18T20:42:43+5:302017-12-18T20:43:14+5:30

गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. मात्र यानिमित्त तयार झालेल्या राजकीय वातावरणामुळे पक्षातील गळती थांबली. त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाला मोठा फायदा होईल, असे मत माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

Congress fail in Gujrat, but beneficial in future; Prithviraj Chavan | गुजरातमध्ये काँग्रेस हरली तरी भविष्यात त्याचा फायदा होईल; पृथ्वीराज चव्हाण

गुजरातमध्ये काँग्रेस हरली तरी भविष्यात त्याचा फायदा होईल; पृथ्वीराज चव्हाण

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसला ग्रामीण भागात चांगले समर्थन मिळाले

आॅनलाईन लोकमत
नागपूर : गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. मात्र यानिमित्त तयार झालेल्या राजकीय वातावरणामुळे पक्षातील गळती थांबली. त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाला मोठा फायदा होईल, असे मत माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी भाजप सूट, बूटचा पक्ष असल्याची टीका केली होती. गुजरात निवडणुकीच्या परिणामाच्या दिवशी सुरुवातीला कॉंग्रेस समोर असल्याचे चित्र होते. त्यावेळी शेअर मार्केट पडले, नंतर भाजप समोर असल्याचे चित्र येताच त्यात तेजी आली. यामुळे व्यापारी, उद्योगपतींचा भाजपशी थेट संबंध असल्याचे स्पष्ट होते. निवडणुकीत काँग्रेसला ग्रामीण भागात चांगले समर्थन मिळाले. ग्रामीण भागातील नागरिकांनी सरकारच्या कृषी धोरणाला नाकारल्याचे स्पष्ट होते. भापजकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोपही त्यांनी लावला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली. त्यांना अध्यक्ष केल्याने पुढील निवडणुकीत फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दबावामुळेच माजी मुख्यमंत्र्यांनी सोडली कॉंग्रेस?
निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील नेते माजी मुख्यमंत्री यांनी काँग्रेस सोडली. राज्यातही हाच प्रकार घडला. विशेष म्हणजे, त्यांना कोणताही फायदा झाला नाही. यामागे काही तरी कारण आहे. कोणत्या तरी दबावाखाली त्यांनी पक्ष सोडला असून, यामागे भाजप असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.

 

 

Web Title: Congress fail in Gujrat, but beneficial in future; Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.