नागपूरच्या  प्रशांत वासनकरविरुद्ध दोषारोप निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:14 PM2018-12-13T22:14:47+5:302018-12-13T22:17:45+5:30

आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर याच्यासह अन्य आरोपींविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी कट रचणे, फसवणूक, विश्वासघात, व्यापाऱ्याने विश्वासघात करणे, धमकी देणे इत्यादी दोषारोप निश्चित केले आहेत. यापैकी व्यापाऱ्याने विश्वासघात करण्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.

Confirmation charged against Prashant Wasankar of Nagpur | नागपूरच्या  प्रशांत वासनकरविरुद्ध दोषारोप निश्चित

नागपूरच्या  प्रशांत वासनकरविरुद्ध दोषारोप निश्चित

Next
ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर याच्यासह अन्य आरोपींविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी कट रचणे, फसवणूक, विश्वासघात, व्यापाऱ्याने विश्वासघात करणे, धमकी देणे इत्यादी दोषारोप निश्चित केले आहेत. यापैकी व्यापाऱ्याने विश्वासघात करण्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.
वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने ४० ते ५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने व ४८ महिने मुदतीच्या वेगवगळ्या आकर्षक योजनांतर्गत गुंतवणूकदारांकडून मोठमोठ्या रकमांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर मुदत संपूनही ठेवी व त्यावरील परतावा अदा करण्यात आला नाही. परिणामी, गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या. त्यानंतर झालेल्या तपासामध्ये आरोपींचे पितळ उघडे झाले. आरोपी गुंतवणूक कार्यक्रम आयोजित करून गुंतवणूकदारांना जाळ्यात फसवीत होते. कंपनीने नेमलेले एजन्टस् राज्यभर फिरून गुंतवणूकदारांना आकर्षित करीत होते. दोषारोपांवर १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होईल. त्यानंतर साक्षीदार तपासले जातील. सरकारतर्फे अ‍ॅड. कल्पना पांडे तर, आरोपींतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण आदींनी कामकाज पाहिले.

 

Web Title: Confirmation charged against Prashant Wasankar of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.