निवडणूक काळातला नक्षली उपद्रव रोखण्यासाठी व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 03:42 AM2018-10-22T03:42:44+5:302018-10-22T03:42:52+5:30

तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकांदरम्यान नक्षलवाद्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नागपुरात व्यूहरचना केली जात आहे.

Configuration to prevent naxalite nuisance during election period | निवडणूक काळातला नक्षली उपद्रव रोखण्यासाठी व्यूहरचना

निवडणूक काळातला नक्षली उपद्रव रोखण्यासाठी व्यूहरचना

Next

नागपूर : तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकांदरम्यान नक्षलवाद्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नागपुरात व्यूहरचना केली जात आहे. याबाबत येत्या बुधवारी सुराबर्डीच्या नक्षलविरोधी अभियान केंद्रात (एएनओ) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यात पोलीस महासंचालकांसह चार राज्यांतील ४० ते ५० वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्टÑालगतच्या तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही तिन्ही राज्ये महाराष्टÑाच्या गडचिरोली-गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलगत आहेत. महाराष्टÑाच्या तुलनेत उपरोक्त तिन्ही राज्यात नक्षलवाद तीव्र आहे. तिकडे घातपाती कारवाया केल्यानंतर नक्षलवादी गडचिरोली-गोंदियात पळून येतात. हा भाग त्यांच्यासाठी आता रेस्ट झोन झाला आहे. हे रोखण्यासाठी अस्तित्वात आलेल्या आंतरराज्य पोलीस समन्वय परिषोचा कारभार कागदोपत्री सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत नक्षलवादी मोठा घातपात घडविण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून मिळाला आहे.

Web Title: Configuration to prevent naxalite nuisance during election period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.