बैलबंडीवर दुचाकी वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:31 AM2018-05-26T01:31:21+5:302018-05-26T01:31:32+5:30

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा सध्या देशात चांगलाच गाजत आहे. या दरवाढीविरोधात सर्वत्र विरोध सुरू आहे. शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलबंडीवर दुचाकी वाहने वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला.

Condemned hike of petrol and diesel price by carrying a two-wheeler on bulkcart | बैलबंडीवर दुचाकी वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध 

बैलबंडीवर दुचाकी वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध 

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा सध्या देशात चांगलाच गाजत आहे. या दरवाढीविरोधात सर्वत्र विरोध सुरू आहे. शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलबंडीवर दुचाकी वाहने वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला.
दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकातून या बैलबंडी मोर्चाला सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील हे स्वत: बैलबंडी चालवत होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये हे बैलबंडीवरून घोषणा देत होते. या मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला. यानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या माध्यमातून मख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास भाजपा सरकारच्या विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राजाभाऊ टांकसाळे, सलील देशमुख, अनिल अहीरकर, प्रवीण कुंटे पाटील, वेदप्रकाश आर्य आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सामान्यांचा अंत पाहू नका : जयंत पाटील
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना राज्य व केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कर लावल्यामुळे देशात सर्वाधिक पेट्रोल-डिझेलचे भाव आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे. त्यात सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वच वस्तू महाग होत चालल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघडले आहे. ही दरवाढ तातडीने कमी करावी. सामान्यांचा अंत पाहू नका, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

Web Title: Condemned hike of petrol and diesel price by carrying a two-wheeler on bulkcart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.