नागपुरातील खड्डे पुनर्भरणाची कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:19 PM2019-06-10T23:19:34+5:302019-06-10T23:20:37+5:30

पावसाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शहराच्या विविध भागात कामासाठी वीज कंपन्यांनी खोदलेले खड्डे बुजवून त्याचे योग्य प्रकारे पुनर्भरण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.

Complete the repairs of the potholes in Nagpur immediately: Guardian Minister Chandrasekhar Bavankule | नागपुरातील खड्डे पुनर्भरणाची कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

नागपुरातील खड्डे पुनर्भरणाची कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

Next
ठळक मुद्देविविध कामांचा मनपात घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शहराच्या विविध भागात कामासाठी वीज कंपन्यांनी खोदलेले खड्डे बुजवून त्याचे योग्य प्रकारे पुनर्भरण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.
शहरातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी महापालिका मुख्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी महापौर नंदा जिचकार, आयुक्त अभिजित बांगर, आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, झोन सभापती माधुरी ठाकरे, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, रिता मुळे, रूपाली ठाकूर, स्वाती आखतकर, नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, महावितरणचे अधीक्षक अभियंता (शहर) दिलीप दोडके, हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले आदी उपस्थित होते.
वीज कंपनीने ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवले असून, सामान रस्त्यांवर पडून आहे. पुन्हा खोदकामासाठी महापालिकेकडे परवानगी मागत आहेत. खड्ड्यांचे पुनर्भरण योग्यरीत्या न केल्यास पावसाळ्यात याचा नागरिकांना त्रास होणार असल्याचे प्रवीण दटके यांनी निदर्शनास आणले. कामात हयगय केली गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, वीज कंपनीने मनपाच्या मुख्य अभियंत्यासोबत समन्वय ठेवून सध्या जी कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी पूर्वी वीज कंपनीची जी कामे आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
रेशीमबाग येथील मनपाचे समाजभवन संस्थेला देण्याबाबतचा निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राजाबाक्षा येथील देवस्थान विकासाकरिता मंजूर निधीचा उपयोग करून तातडीने तेथील कार्य सुरू करण्यात यावे, रमना मारोती ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकासासाठी मंजूर निधीतून मंदिर व परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्रांनी दिले. छोटा ताजबागचा स्वदेश दर्शनअंतर्गत विकास प्रस्तावित आहे. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील व विकास कार्य सुरू होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पट्टे नोंदणी शुल्काचा प्रश्न निकाली
शासनाच्या निर्णयानुसार लोकांना पट्टेवाटप करण्यात येत आहे. नझुलच्या जागेवरील पट्टेवाटपासाठी दुय्यम निबंधकाकडे रजिस्ट्रीसाठी गेले असता अडीचशे वर्गफुटासाठी ४४ हजार रुपये मुद्रांकशुल्क मागितल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर बोलून हा प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले.
उंच राष्ट्रध्वजाबाबत तातडीची बैठक
दक्षिण नागपुरातील झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप करण्यासंदर्भातील अडचणी दूर करण्यासोबतच कस्तूरचंद पार्क येथील प्रस्तावित सर्वात उंच राष्ट्रध्वजाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासंदर्भात मंगळवारी तातडीची बैठक घेऊन त्यावर त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Web Title: Complete the repairs of the potholes in Nagpur immediately: Guardian Minister Chandrasekhar Bavankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.