बिल्डर डांगरेविरुद्ध पुन्हा एक तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:25 AM2019-06-26T00:25:57+5:302019-06-26T00:27:04+5:30

उच्च न्यायालयाने मध्यस्थ म्हणून नेमलेल्या वकिलाच्या कक्षात वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार प्रदीप नीळकंठ खोडे यांनी सक्करदरा पोलिसांकडे नोंदवली आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही या तक्रारीतून खोडे यांनी व्यक्त केली आहे.

Complaint against builder Dangre | बिल्डर डांगरेविरुद्ध पुन्हा एक तक्रार

बिल्डर डांगरेविरुद्ध पुन्हा एक तक्रार

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यस्थ वकिलाच्या कक्षात धमकी : सक्करदरा पोलिसांनी नोंदवली एनसी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाने मध्यस्थ म्हणून नेमलेल्या वकिलाच्या कक्षात वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार प्रदीप नीळकंठ खोडे यांनी सक्करदरा पोलिसांकडे नोंदवली आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही या तक्रारीतून खोडे यांनी व्यक्त केली आहे.
डांगरेविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा यापूर्वीच दाखल झाला आहे. यासंबंधाने प्रदीप खोडे यांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने मध्यस्थ म्हणून अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांची नियुक्ती केली आहे. त्यासंबंधाने अ‍ॅड. पुरोहित यांच्या कक्षात २४ जूनला दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास विजय डांगरे आणि प्रदीप खोडे आले होते. डांगरे आणि खोडेमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारासंबंधीची चर्चा सुरू असताना, खोडे यांनी डांगरेंना मी तुमच्या घरी रक्कम आणून दिली होती आणि परत घेण्यासाठी अनेक वर्षांपासून चकरा मारत आहो. मला आर्थिक आणि मानसिक त्रास झाला, मात्र माझी रक्कम परत मिळाली नाही, असे खोडे यांनी म्हटले. त्यावर गरमागरम चर्चा झाल्यानंतर डांगरे लगेच उठून उभे झाले. ‘तू आता बाहेर निघ, चल तुला पाच मिनिटात निपटवून देतो’, अशी धमकी अ‍ॅड. पुरोहित यांच्या कक्षात दिल्याचे तक्रारीत खोडे यांनी नमूद केले आहे. अ‍ॅड. पुरोहित यांनी दोघांनाही शांत केल्यानंतर प्रकरण निवळल्याचे खोडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. डांगरे यांची वृत्ती लक्षात घेता आपल्याला आणि आपल्या परिवारातील सदस्याच्या जीवाला धोका आहे, असेही या तक्रारीत खोडे यांनी म्हटले आहे. सक्करदरा पोलिसांनी या तक्रारीची नोंद कलम ५०६ अन्वये अदखलपात्र अशी केली आहे.

Web Title: Complaint against builder Dangre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.