चेन्नई एक्सप्रेस नेली दोन किलोमीटर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:00 AM2018-06-02T11:00:30+5:302018-06-02T11:00:39+5:30

नागपूर : धावत्या रेल्वेतून लहान भाऊ खाली पडला. मोठ्या भावाने रडतरडत सहप्रवाशांच्या मदतीने चेन पुलिंग केले. लोकोपायलटनेही माणुसकीचा परिचय देत गाडी दोन किलोमीटर मागे नेली.

Chennai Express runs two kilometer behind | चेन्नई एक्सप्रेस नेली दोन किलोमीटर मागे

चेन्नई एक्सप्रेस नेली दोन किलोमीटर मागे

Next
ठळक मुद्देभरतवाडाजवळील घटना लहान भाऊ खाली पडला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धावत्या रेल्वेतून लहान भाऊ खाली पडला. मोठ्या भावाने रडतरडत सहप्रवाशांच्या मदतीने चेन पुलिंग केले. लोकोपायलटनेही माणुसकीचा परिचय देत गाडी दोन किलोमीटर मागे नेली. जखमीला गाडीत टाकले आणि नागपूरला आणले. वेळीच त्याला उपचार मिळाल्याने तो सुखरूप आहे. ही गंभीर घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूरपासून २० कि.मी. अंतरावरील भरतवाडा रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
विकास रघुनाथसिंग (२१) रा. कन्नोज, उत्तर प्रदेश असे जखमीचे नाव आहे. विकास आणि त्याचा मोठा भाऊ राहुलकुमार (२४) दोघेही रोजगारासाठी घराबाहेर पडले. विकासला आई-वडील, तीन भाऊ आणि चार बहिणी आहेत. वडील मजुरी करतात. घरची आर्थिक स्थिती नाजुक असल्याने विकास आणि राहुलकुमार विजयवाडा येथे काम शोधण्यासाठी निघाले होते. गुरुवारी ते गुरुसाहेबगंज रेल्वे स्थानकाहून निघाले अणि कानपूरला पोहोचले. कानपूरहून विजयवाड्याला जाण्यासाठी ते लखनौ -चेन्नई एक्स्प्रेसच्या जनरल बोगीने प्रवास करीत होते. दरम्यान विकासची प्रकृती बिघडली. भरतवाडा जवळ गाडी असताना विकास उलटी करण्यासाठी गाडीच्या दाराजवळ गेला. उलटी करीत असतानाच तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. ही माहिती सहप्रवाशाने राहुलकुमारला दिली. राहुलकुमार रडून सहप्रवाशांना चेनपुलींग करण्याची विनवणी करीत होता. तेवढ्यात सहप्रवाशांनी चेन पुलींग करून गाडी थांबविली. गाडीखाली उतरताच राहुलकुमार भावाकडे धावत सुटला. गाडीतील प्रवासीही खाली उतरले. लोकोपायलटला घटना समजताच त्यानेही माणुसकीचा परिचय देत गाडी दोन किलोमीटर मागे नेली. विकासला सहप्रवाशांच्या मदतीने गाडीत टाकून नागपुरात आणण्यात आले. त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले.वेळीच मदत मिळाल्यामुळे विकासचे प्राण वाचू शकले.

Web Title: Chennai Express runs two kilometer behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.