शेफ विष्णू मनोहर करणार तीन हजार किलो खिचडीचा रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:12 AM2018-09-23T01:12:00+5:302018-09-23T01:15:14+5:30

सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडी एकाच भांड्यात तयार करण्याचा विश्वविक्रम करणार आहेत, अशी माहिती मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांनी विष्णू की रसोई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Chef Vishnu Manohar will record three thousand Kg khichadi | शेफ विष्णू मनोहर करणार तीन हजार किलो खिचडीचा रेकॉर्ड

शेफ विष्णू मनोहर करणार तीन हजार किलो खिचडीचा रेकॉर्ड

googlenewsNext
ठळक मुद्दे१४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर होणार विश्वविक्रम

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडी एकाच भांड्यात तयार करण्याचा विश्वविक्रम करणार आहेत, अशी माहिती मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांनी विष्णू की रसोई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे, यासाठी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर १४ आॅक्टोबरला एकाच भांड्यात तीन हजार किलोची खिचडी बनविणार आहेत. मैत्री परिवार संस्थेने नियोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. यात १४ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता खिचडी बनविणे सुरू होईल. दुपारी ३ वाजता उद्घाटन होईल. खिचडीसाठी ५०० किलो डाळ, ५०० किलो तांदूळ, ५० किलो तूप, ५० किलो तेल, ३०० किलो भाजी, गाजर ही सामुग्री वापरण्यात येईल. खिचडी बनविण्यासाठी ३,१२८ किलो क्षमतेची आणि १० फुटाची कढई कोल्हापूरचे इंजिनिअर नीलेश पै यांनी तयार केली आहे. तयार झालेली खिचडी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० दरम्यान नागरिकांना वितरित करण्यात येईल. या विक्रमासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड यांचे संमतीपत्र आले आहे. हा विक्रम पाहण्यासाठी १५ शाळांमधील विद्यार्थी, नागरिक हजेरी लावणार आहेत. डिसेंबर महिन्यात जळगाव येथे २५०० किलो वांग्याचे भरीत तयार करण्याचा रेकॉर्डही विष्णू मनोहर करणार असल्याचे प्रा. भेंडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके, विजय जथे, राजीव जयस्वाल, विजय शहाकार, निरंजन वासेकर उपस्थित होते.

Web Title: Chef Vishnu Manohar will record three thousand Kg khichadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.