दोन लाखाचे आमिष दाखवून ग्रामस्थांची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:17 PM2019-02-14T23:17:18+5:302019-02-14T23:19:00+5:30

बेटी बचाव बेटी पढाव अभियानात दोन लाख रुपयांचा लाभ मिळण्याचे आमिष दाखवून, ग्रामस्थांकडून अर्ज भरून घेत लुबाडणूक करण्यात येत आहे. ही बाब जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. ग्रामस्थांनी अभियानाचा अपप्रचार करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच असा अपप्रचार करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Cheating of villagers by showing lacquer of two lacs | दोन लाखाचे आमिष दाखवून ग्रामस्थांची लुबाडणूक

दोन लाखाचे आमिष दाखवून ग्रामस्थांची लुबाडणूक

Next
ठळक मुद्दे‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ अभियानाच्या नावावर अपप्रचार

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : बेटी बचाव बेटी पढाव अभियानात दोन लाख रुपयांचा लाभ मिळण्याचे आमिष दाखवून, ग्रामस्थांकडून अर्ज भरून घेत लुबाडणूक करण्यात येत आहे. ही बाब जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. ग्रामस्थांनी अभियानाचा अपप्रचार करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच असा अपप्रचार करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी नागपुरसह देशभरात बेटी पढाओ बेटी बचाओ ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना पूर्णत: प्रचार प्रसिध्दीची योजना आहे. मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, लिंग गुणोत्तर वाढविणे आदी उद्दिष्टे यात ठेवण्यात आली आहे. यासाठी विविध पातळीवर प्रचार-प्रसिध्दी चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात येत आहे. परंतु काही मध्यस्थ व काही संस्था या योजनेच्या नावाखाली जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची लूबाडणूक करीत असल्याचे लक्षात येत आहे. त्यात अशा व्यक्ती व संस्था मुलींचा नावे अर्ज भरुन घेत, त्यापोटी अर्जाची किंमत व नोंदणी शुल्क वसूल करीत आहे. तसेच मुलींच्या नावे २ लाख रुपयापर्यंत लाभ मिळण्याचे आमिष देत आहे. अशा मौखिक तक्रारी जि.प.च्या महिला व बाल विकास विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. सदरची योजना ही पूर्णत: प्रचार प्रसिध्दीची योजना असून, समाजात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी लोकांची जनजागृती करण्याची ही योजना आहे. यात कुठल्याही प्रकारचा रोख स्वरुपाचा लाभ देण्यात येत नाही. तरी ग्रामीण जनतेने कुठल्याही भूलथापांना बळी न पडता अशा व्यक्ती संस्थांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन जि.प.च्या महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी भागवत तांबे यांनी केले आहे.

Web Title: Cheating of villagers by showing lacquer of two lacs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.