चंदीगडमधील ठगाचा नागपूरच्या डॉक्टरला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 09:10 PM2018-05-12T21:10:08+5:302018-05-12T21:10:19+5:30

The cheater of Chandigarh duped , Nagpur doctor | चंदीगडमधील ठगाचा नागपूरच्या डॉक्टरला गंडा

चंदीगडमधील ठगाचा नागपूरच्या डॉक्टरला गंडा

googlenewsNext
ठळक मुद्दे३५ लाख हडपले : मशीन विक्रीच्या व्यवहारात फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्जरीसाठी वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणाचा सौदा करून ३५ लाख रुपये घेतल्यानंतर चंदीगड (पंजाब) मधील एका ठगबाजाने डॉक्टरला प्रतिसाद देणे बंद केले. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. पंकज रामचंद्र निंबाळकर (वय ४१) यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
डॉ. निंबाळकर प्रशांतनगरात राहतात. ते मेडिकल चौकातील सेंट्रल पॉर्इंट हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना त्यांनी १ एप्रिल २०१७ ला सर्जरीसाठी वापरात येणाऱ्या मशीनला ते आॅनलाईन सर्च करीत होते. त्यांना पाहिजे असलेली मशीन मोहाली, चंदीगडमधील हिरकपूरच्या विजय शेट्टीकडे उपलब्ध असल्याचे कळले. शेट्टीचे मोहालीत डिफाईन हेल्थ केअर आहे. त्यामुळे त्यांनी शेट्टीसोबत संपर्क करून ही मशीन १ कोटी, ५ लाखात विकत घेण्याचा करार केला. वारंवार बोलणी झाल्यानंतर डॉ. निंबाळकरांनी १ एप्रिल ते ८ जून २०१७ या कालावधीत शेट्टीच्या बँक खात्यात ३५ लाख रुपये जमा केले. ही रक्कम काढून घेतल्यानंतर आरोपी शेट्टीने डॉ. निंबाळकरांसोबतचा संपर्क तोडला. तो कसलाही प्रतिसाद देत नसल्याने त्याने फसवणूक केल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यावरून डॉ. निंबाळकरांनी इमामवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. प्रदीर्घ चौकशीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: The cheater of Chandigarh duped , Nagpur doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.