चतुर्वेदी, राऊत लॉबिंगसाठी दिल्लीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:19 AM2017-09-21T01:19:55+5:302017-09-21T01:20:14+5:30

विदर्भातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेऊन वेगळी विदर्भ प्रदेश काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी केल्यानंतर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत पुढील लॉबिंगसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

Chaturvedi, Raut for lobbying in Delhi | चतुर्वेदी, राऊत लॉबिंगसाठी दिल्लीत

चतुर्वेदी, राऊत लॉबिंगसाठी दिल्लीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेऊन वेगळी विदर्भ प्रदेश काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी केल्यानंतर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत पुढील लॉबिंगसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार खा. अहमद पटेल यांची भेट घेण्याची तयारी या नेत्यांनी चालविली आहे.
१५ सप्टेंबर रोजी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या नागपुरातील घरी बैठक झाली. बैठकीत चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, डॉ. नितीन राऊत, अनिस अहमद, माजी आमदार अशोक धवड आदी उपस्थित होते. या बैठकीत प्रदेश काँग्रेसचे अस्तित्व नाकारून विदर्भासाठी वेगळी विदर्भ प्रदेश काँग्रेसची मागणी हायकमांडकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड बुधवारी दिल्लीत दाखल झाले. या नेत्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेऊन संबंधित मागणी करण्याची फिल्डिंग लावली आहे. यापूर्वीही संबंधित नेत्यांनी दिल्लीत अहमद पटेल यांची भेट घेत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत आपली पकड मजबूत करण्याचा हेतू या दिल्ली दौºयामागे असल्याची चर्चा आहे.

Web Title: Chaturvedi, Raut for lobbying in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.