राष्ट्र उभारणीत सीए आणि बँकर्स भागीदार : एमव्हीआर रविकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:37 AM2019-03-21T00:37:38+5:302019-03-21T00:39:18+5:30

कोणत्याही राष्ट्राला सुपर पॉवर म्हणायचे असेल तर फक्त लष्करी शक्ती पुरेशी नसून आर्थिक शक्तीही आवश्यक आहे. चार्टर्ड अकाऊंटंटच्या सक्षम समर्थनाशिवाय बँका एकट्याने काम करू शकत नाही. त्यांनी गुणवत्तेच्या लेखापरीक्षणांवर अधिक जोर दिल्यास बँकांचे काम सोपे होते. राष्ट्र उभारणीत सीए आणि बँकर्स भागीदार असल्याचे मत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक एमव्हीआर रविकुमार यांनी येथे व्यक्त केले.

CA and banker are partner in nation building: MVR Ravikumar | राष्ट्र उभारणीत सीए आणि बँकर्स भागीदार : एमव्हीआर रविकुमार

राष्ट्र उभारणीत सीए आणि बँकर्स भागीदार : एमव्हीआर रविकुमार

Next
ठळक मुद्दे नागपूर सीए शाखेतर्फे बँक ब्रँच ऑडिटवर चर्चासत्र

लोकमत न्यूज  नेटवर्क  
नागपूर : कोणत्याही राष्ट्राला सुपर पॉवर म्हणायचे असेल तर फक्त लष्करी शक्ती पुरेशी नसून आर्थिक शक्तीही आवश्यक आहे. चार्टर्ड अकाऊंटंटच्या सक्षम समर्थनाशिवाय बँका एकट्याने काम करू शकत नाही. त्यांनी गुणवत्तेच्या लेखापरीक्षणांवर अधिक जोर दिल्यास बँकांचे काम सोपे होते. राष्ट्र उभारणीत सीए आणि बँकर्स भागीदार असल्याचे मत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक एमव्हीआर रविकुमार यांनी येथे व्यक्त केले.
आयसीएआयच्या पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर शाखेच्यावतीने ‘बँक ब्रँच ऑडिट’वर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. रविकुमार म्हणाले, अंतिम तिमाहीचे परिणाम आरबीआय आणि अर्थ मंत्रालयाने आणलेल्या आर्थिक बदलांमुळे उत्साहवर्धक होते आणि अर्थव्यवस्था सकारात्मक दिशेने जात आहे. पुढील दिवस बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रासाठी खूप उज्ज्वल आहेत. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमुळे अनेक देश भारताकडे बघत आहेत.
बँकर्सना त्यांचे मानसिक वय तरुण ठेवण्यासाठी सातत्याने शिकणे आवश्यक आहे. बँकांमध्ये ऑडिट कमिटी बोर्ड एक स्वतंत्र विभाग आहे, ज्याकडे बँकिंग व्यवस्थेत फसवणुकीचा तपास करण्यासाठी एक मजबूत आयटी प्रणाली आहे. बँकर्सला सीएंवर आणि जारी प्रमाणपत्रांवर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
आयसीएआयच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर म्हणाले, सतत ज्ञान अद्ययावत करणे हे व्यावसायिक कौशल्य आहे. सदस्यांचे कौशल्य आणि ज्ञानवर्धन करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते. प्रादेशिक परिषदेचे सदस्य सीए अभिजित केळकर यांनी लेखापरीक्षकांकडून अपेक्षा वाढत असल्याने, बँक ऑडिट करण्याच्या काळासाठी फॉरेन्सिक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे सांगितले.
याप्रसंगी आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए जयदीप शाह, सीए जुल्फेश शाह, सीए राजेश खानझोडे, सीए श्रीनिवास जोशी, सीए नितांत त्रिलोकेकर, सीए गोकुल राठी, सीए अभिजित सांझगिरी, सीए श्रीनिवास, सीए अक्षय गुल्हाने, सीए किरिट कल्याणी, सीए संजय अग्रवाल, सीए हरीश रंगवानी, सीए सतीश सारडा, सीए स्वप्निल अग्रवाल, सीए जितेन सागलानी उपस्थित होते.

Web Title: CA and banker are partner in nation building: MVR Ravikumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.