नागपुरात ठिकठिकाणी टायर जाळून व्यक्त केला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 08:32 PM2018-01-03T20:32:33+5:302018-01-03T20:33:50+5:30

भीमा कोरेगावमध्ये भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात सलग दुसऱ्या   दिवशीही तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने बुधवारी विविध भागात मोर्चे, रॅली काढून घोषणाबाजी करीत टायर जाळले. काही रस्ता अडवून धरला. तर काही भागात दगडफेकही झाली. मात्र, शहरात चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे अनुचित घटना घडली नाही.

By burning tyres on road at various places observed Band at Nagpur | नागपुरात ठिकठिकाणी टायर जाळून व्यक्त केला संताप

नागपुरात ठिकठिकाणी टायर जाळून व्यक्त केला संताप

Next
ठळक मुद्देनिषेध, घोषणाबाजी : रस्ताही अडवला : अनेक भागात तणाव

आॅनलाईन लोकमत
नागपूर : भीमा कोरेगावमध्ये भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात सलग दुसऱ्या   दिवशीही तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने बुधवारी विविध भागात मोर्चे, रॅली काढून घोषणाबाजी करीत टायर जाळले. काही रस्ता अडवून धरला. तर काही भागात दगडफेकही झाली. मात्र, शहरात चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे अनुचित घटना घडली नाही.
भीमा कोरेगावमधील सोमवारच्या घटनेची माहिती कळाल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच नागपुरातील वातावरण गरम झाले. भीमसैनिकांवर दगडफेक करणाऱ्यांवर  राष्ट्रद्रोह तसेच अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत तरुणांचे घोळके विविध भागात एकत्र होऊन घोषणाबाजी करीत आहे. मंगळवारी दुपारपासून जरीपटक्यातील भीम चौक, इंदोरा, कमाल चौकात टायर जाळून, बसवर दगडफेक करून जमावाने आपला रोष व्यक्त करीत आहेत. बुधवारी सकाळी विविध भागात मोर्चे, रॅली, टायरची जाळण्याचे प्रकार सुरू झाले. वाडी, इंदोरा, शताब्दी चौक, भीमचौक, मानेवाडा, इमामवाडा, जयताळा भागात मोठ्या संख्येत जमाव घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदवत होता. शताब्दी चौक आणि वाडीत जमाव आक्रमक होत असल्याचे पाहून पोलसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारांची समजूत काढत परिस्थिती हाताळली. काही ठिकाणी जमावाने रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला.
दरम्यान, मंगळवारी रात्री विविध भागात तणाव वाढत असल्याचे पाहून बुधवारी सकाळपासूनच पोलिसांचा शहरातील महत्त्वाची ठिकाणं आणि संवेदनशिल भागात प्रचंड ताफा तैनात करण्यात आला होता. मदतीला राखीव दलाच्या तुकड्यांही बोलवून घेतले होते. तणाव किंवा आंदोलकांशी बाचाबाची होत असल्याचे पाहून वरिष्ठ अधिकारी लगेच घटनास्थळी पहचून परिस्थीती हाताळत होते.

Web Title: By burning tyres on road at various places observed Band at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.