Building of the Kingsway Hospital unsafe: pillar damage due to fire | किंग्सवे हॉस्पिटलची इमारत असुरक्षित : आगीमुळे पिलरला नुकसान
किंग्सवे हॉस्पिटलची इमारत असुरक्षित : आगीमुळे पिलरला नुकसान

ठळक मुद्देअतिरिक्त माळ्यांना मंजूरी देणे घातक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फोम, फर्निचरला लागलेल्या आगीमुळे कस्तूरचंद पार्कसमोर निर्माणाधीन किंग्सवे हॉस्पिटलच्या बहुमजली इमारतीच्या पिलरचे नुकसान झाले आहे. फोम जळल्यामुळे इमारतीत उष्णतेचे प्रमाण जास्त निर्माण झाले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यास जवळपास दीड तास लागला होता. आगीमुळे पिलराच्या आतील सळाखींला हानी पोहोचली असून त्या कमजोर झाल्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत इमारत नेहमीसाठी असुरक्षित असल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
ग्रेट नाग रोड येथील लोखंडे यांच्या इमारतीत काही वर्षांपूर्वी आग लागली होती. आग इमारतीच्या तळमाळ्यावर साठवून ठेवलेल्या प्लास्टिमुळे लागली होती. आगीत पिलरच्या आतील सळाखी गरम होऊन कमजोर झाल्या होत्या. आग विझविल्यानंतर संपूर्ण इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली होती. या घटनेत एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यासह काही लोकांना जीव गमवावा लागला होता. तसे पाहिल्यास किंग्सवे हॉस्पिटलची आग भीषण होती. फोमच्या आगीमुळे हॉस्पिटलच्या इमारतींच्या पिलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोणत्याही इमारतीचा पायवा पिलरच्या आधारावर निश्चित होतो. या इमारतीच्या दुसºया आणि तिसºया माळ्यावर आग लागली होती. आगीमुळे पायव्याच्या पिलरला नुकसान झाले नाही, पण दुसºया आणि तिसºया माळ्यावरील पिलरच्या आतील सळाखी पिघळल्याची शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा स्थितीत चौथ्या माळ्यावरील इमारतीचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. जर इमारत कोसळली तर संपूर्ण इमारतीला नुकसान होऊ शकते.
उपरोक्त शक्यता पाहता मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नगररचना विभाग आणि शहर अभियंत्याला नुकसानीची माहिती दिली आहे. इमारतीच्या बाजूला बँक आणि आयुर्विमा कार्यालय आहे. येथे नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. अशा स्थितीत इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट तात्काळ करणे आवश्यक आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, आगीमुळे इमारतीचे नुकसान झाले आहे. त्याचे आकलन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे पत्र लिहिण्यात आले आहे. नगररचना आणि शहर अभियंते संपूर्ण इमारतीची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे आकलन करणार आहेत.
अतिरिक्त बांधकामाला मंजूरी देणे घातक
किंग्सवे हॉस्पिटलच्या इमारतीला ग्राऊंड प्लस सहा माळ्यांना मंजूरी देण्यात आली आहे. पण त्यापेक्षा जास्त मजले तयार करण्यात आले आहेत. इमारतीचा संशोधित नकाशा अग्निशमन विभाग आणि नगररचना विभागाकडे पाठविला आहे. आगीमुळे पिलरचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत अतिरिक्त बांधकामाला मंजूरी देणे घातकच ठरणार आहे.

 


Web Title: Building of the Kingsway Hospital unsafe: pillar damage due to fire
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.