अमरावतीच्या घटनेने बसपा नेते हादरले ; मुख्य प्रभारी राजभर यांचा दौरा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 08:38 PM2019-06-18T20:38:05+5:302019-06-18T20:39:22+5:30

अमरावती येथे बसपाच्या आढावा बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सामान्य कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपात गैरप्रकार केल्याचा आरोप करीत कार्यकर्ते नेत्यांच्या अंगावर धावून गेले. काहींना मारही खावा लागला. बसपाच्या राज्यस्तरीय नेत्यांनीच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या घटनेचा धसका घेतला असून विदर्भातील सर्व बैठका तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी राजभर यांनी आपला दौराही रद्द केला आहे.

BSP leaders panic due to Amravati incident; Chief incharge Rajbhar tour canceled | अमरावतीच्या घटनेने बसपा नेते हादरले ; मुख्य प्रभारी राजभर यांचा दौरा रद्द

अमरावतीच्या घटनेने बसपा नेते हादरले ; मुख्य प्रभारी राजभर यांचा दौरा रद्द

Next
ठळक मुद्देविदर्भातील आढावा बैठकी पुढे ढकलल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरावती येथे बसपाच्या आढावा बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सामान्य कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपात गैरप्रकार केल्याचा आरोप करीत कार्यकर्ते नेत्यांच्या अंगावर धावून गेले. काहींना मारही खावा लागला. बसपाच्या राज्यस्तरीय नेत्यांनीच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या घटनेचा धसका घेतला असून विदर्भातील सर्व बैठका तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी राजभर यांनी आपला दौराही रद्द केला आहे.
निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोपाचा प्रकार बसपात नवा नाही. परंतु यंदा पहिल्यांदाच हा वाद चव्हाट्यावर आला आहे. सामान्य कार्यकर्ते उघडपणे नेत्यांना जाब विचारत आहेत. अमरावतीतील घटनाही यातलाच प्रकार आहे. या बैठकीला बसपाचे प्रदेश प्रभारी संदीप ताजणे, श्रीकृष्ण बेले, प्रमोद रैना आणि अमरावतीचे मनपा गटनेते चेतन पवार उपस्थित होते. त्यांना सामान्य कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यापूर्वी नागपुरातील एका बैठकीतही असाच काहीसा प्रकार झाला. नागपुरातील बसपाचे लोकसभेचे उमेदवार मो. जमाल यांना पक्षातून काढण्यात आले. त्यांनी निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. परंतु मो. जमाल यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीच पक्षविरोधी कार्य केल्याचा थेट आरोप केला होता. अलीकडेच नागपूर शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दलही कार्यकर्त्यांची नाराजी आहे. एकूणच बसपामध्ये अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. हा रोष अमरावतीत दिसून आला. नागपुरात त्याचे पडसाद अधिक तीव्रतेने उमटण्याची भीती लक्षात घेता २२ जूनपासून होणाऱ्या विदर्भातील आढावा बैठकीच रद्द करण्यात आल्या आहेत.
शनिवारपासून होता दौरा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील झोननिहाय आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. २२ तारखेला वर्धेपासून या बैठकी होणार होत्या. २३ जून रोजी नागपूर, २५ जून औरंगाबाद, २६ जून मुंबई, २७ जून नाशिक अशा या बैठकी होणार होत्या. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी रामअचल राजभर हे स्वत: मार्गदर्शन करणार होते. रामअचल राजभर हे बसपाचे राष्ट्रीय महासचिव असून ते उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व होते. परंतु आता त्यांचा दौरा रद्द झाला आहे. याबाबत बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांना विचारणा केली असता त्यांनीही दौरा रद्द झाल्याचे सांगितले. परंतु अमरावतीच्या घटनेशी याचा संबंध नाही. हा दौरा परवाच रद्द झाला. मायावती यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना लखनौला बोलावल्याने विदर्भातील बैठका रद्द झाल्याचे शेवडे यांचे म्हणणे होते. परंतु पक्षातील सूत्रांनुसार अमरावतीच्या घटनेमुळे नते हादरले आहेत. त्यामुळेच हा दौरा रद्द झाल्याचे सांगितले जाते.

Web Title: BSP leaders panic due to Amravati incident; Chief incharge Rajbhar tour canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.