नागपूरच्या धर्तीवर मुंबईत ब्रॉडगेज मेट्रो फीडर सर्व्हिस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 06:30 PM2018-07-16T18:30:48+5:302018-07-16T23:17:03+5:30

नागपूरच्या धर्तीवर मुंबईत ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे फीडर सर्व्हिस सेवा सुरू करण्यासह नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस-वेसोबतच हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी येथे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गासोबत मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडोर बनविण्याची घोषणा करण्याचा आग्रह केला. गोयल म्हणाले, हा कॉरिडोर बनल्यास केवळ साडेचार ते पाच तासात नागपूरहून मुंबईत पोहोचता येईल. यामुळे विदर्भातील शेतकरी लाभान्वित होईल. या धर्तीवर देशातील अन्य नवीन महामार्गाला रेल्वेशी जोडण्यात येणार आहे.

Broad-gauge Metro Feeder Service in Mumbai on the base of Nagpur | नागपूरच्या धर्तीवर मुंबईत ब्रॉडगेज मेट्रो फीडर सर्व्हिस

नागपूरच्या धर्तीवर मुंबईत ब्रॉडगेज मेट्रो फीडर सर्व्हिस

Next
ठळक मुद्देपीयूष गोयल : समृद्धी एक्स्प्रेस-वेसोबत हायस्पीड रेल्वे धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या धर्तीवर मुंबईत ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे फीडर सर्व्हिस सेवा सुरू करण्यासह नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस-वेसोबतच हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी येथे केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गासोबत मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडोर बनविण्याची घोषणा करण्याचा आग्रह केला. गोयल म्हणाले, हा कॉरिडोर बनल्यास केवळ साडेचार ते पाच तासात नागपूरहून मुंबईत पोहोचता येईल. यामुळे विदर्भातील शेतकरी लाभान्वित होईल. या धर्तीवर देशातील अन्य नवीन महामार्गाला रेल्वेशी जोडण्यात येणार आहे.
ब्रॉडगेज मेट्रो फीडर ट्रेन सर्व्हिसकरिता भारतीय रेल्वे आणि मेट्रो रेल्वेत सामंजस्य करार सोमवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आला. यावेळी अन्य प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर विशेष अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनमुळे खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाचे सचिव डी.एस. मिश्रा, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, वेस्टर्न कोलफिल्डचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन सिंह, रेल्वे बोर्डाचे सदस्य जी.के. पिल्लई, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित, मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेशकुमार आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
पीयूष गोयल म्हणाले, भारतीय रेल्वे आणि मेट्रो रेल्वेमधील करारानुसार रेल्वेच्या रुळावर मेट्रो रामटेक, सावनेर, काटोल, वर्धा आणि भंडारा येथे धावणार आहे. त्याचा विदर्भातील युवक आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

नागपुरात तयार होणार ब्रॉडगेज मेट्रो कोच : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी समृद्धी महामार्गासोबत हायस्पीड रेल्वे सुरू करण्याची घोषणा करावी. जेएनपीटी पोर्टसोबत समृद्धी महामार्गावरील १४ जिल्हे जुळल्यामुळे त्यांना नवीन रेल्वे कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळेल. नागपुरातून सुरू होणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रो फीडर सर्व्हिसमुळे विदर्भाचा एक भाग जुळणार आहे. त्याकरिता लागणाऱ्या कोचेसची निर्मिती नागपूरलगत करण्यात येणार आहे. नागपूर मॉडेलला अन्य मोठे शहर आणि सॅटेलाईट सिटीमध्ये राबविण्यात येईल.

बायो इंधनावर धावणार बसेस : नितीन गडकरी
केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नागपुरात कोराडी, खापरखेडासह उमरेड येथे प्रस्तावित वीज प्रकल्पाला पुनर्प्रक्रिया केलेले पाणी मिळेल. या घाण पाण्यातून निघालेल्या मिथेन गॅसपासून बायो इंधन बनवून त्यापासून मनपाच्या बसेस धावणार आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. नागपूरच्या धर्तीवर गंगा नदीचे घाण पाणी पुनर्प्रक्रिया करणारे २५९ वेस्ट वॉटर प्रकल्प सुरू आहेत. मथुरा येथे इंडियन आॅईलला हे पाणी देण्याचा करार झाला आहे.

महाराष्ट्रात चार वर्षांत सर्वाधिक गुंतवणूक 
रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले, गत चार वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक २२ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. मुंबईत प्रवासी सुविधा आणि सुरक्षेवर ६७ कोटी रुपयांचे काम सुरू होणार आहे. रेल्वेच्या इतिहासात राज्यात एवढी गुंतवणूक कधीही झाली नाही. रेल्वेच्या विद्युतीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. यामुळे पुढील चार वर्षांत सर्व रेल्वे विजेवर धावतील आणि त्यामुळे १५ हजार कोटी रुपयांच्या डिझेलची बचत होईल. त्यामुळे भाडे आणि प्रदूषण कमी होईल.
कोळसा मंत्री गोयल म्हणाले, ३०० क्युबिक मीटर रेती किफायत घरांच्या बांधकामासाठी देण्यात येईल. सुरुवात वेकोलिने केली आहे. याकरिता १० दिवसांत निविदा निघणार आहे. त्यानंतर व्यावसायिकरीत्या रेती उपलब्ध करण्यात येईल. कोळशाच्या पुरवठ्यासाठी थर्ड पार्टी सॅम्पलिंग बंधनकारक केल्यामुळे आता खाणींच्या कोळशात दगड येत नाहीत. यामुळे वीज प्रकल्पांना कोळसा मिळाल्याने दर आठ टक्के कमी झाले आहेत. 

पहिल्यांदा पाच खाणींचा कोळसा थेट वीज प्रकल्पात : बावनकुळे
चंद्रशेखर बावनमुळे म्हणाले, जगात तीन खाणींतून पाईप कन्वेअरच्या माध्यमातून वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा होतो. पण भारतात आता ५ खाणींतून पाईप कन्वेअरद्वारे प्रकल्पांना कोळशाचा थेट पुरवठा होईल. हे काम दीड वर्षांत पूर्ण होईल. मनपाचे पुनर्प्रक्रिया केलेले पाणी उमरेड येथील वीज प्रकल्पाला मिळेल. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावनेर येथील २० हजार घरांना वाचविण्यासाठी संबंधित जमिनीवरील आरक्षण रद्द करण्याची विनंती वेकोलि व्यवस्थापनाकडे केली. 

केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाचे सचिव डी.एस. मिश्रा आणि रेल्वे बोर्डचे चेअरमन अश्विनी लोहाणी यांनी मार्गदर्शन केले. पाहुण्यांचे हस्ते महाराष्ट्रातील रेल्वेच्या कामांचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर सोमेश कुमार यांनी आभार मानले. 

समारंभात स्वतंत्र विदर्भाची मागणी
नितीन गडकरी यांनी भाषण देण्यास सुरुवात करताच पे्रक्षकांमधून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा टायगर फोर्सचे मार्गदर्शक मुकेश मासूरकर याने मोठ्या आवाजात स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा आणि रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली. गडकरी यांनी त्याला सभागृहाबाहेर नेण्याचे आदेश दिले. गडकरी म्हणाले, मिहानमध्ये पाच वर्षांत ५० हजार युवकांना रोजगार मिळेल. भारतात सर्वाधिक रोजगार नागपुरात राहील. ज्या नेत्यांनी रोजगार दिला नाही, अशा नेत्यांचे उचक्के कार्यकर्ते नेहमीच भेटतात. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. 

मान्यवरांची उपस्थिती
मंचावर खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाचे सचिव डी.एस. मिश्रा, राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाचे प्रधान सचिव अरविंद सिंग, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, वेस्टर्न कोलफिल्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन सिंह, रेल्वे बोर्डचे चेअरमन अश्विनी लोहाणी, सदस्य जी.के. पिल्लई, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा, दमपू रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सोईन, मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेशकुमार, दपूम रेल्वेच्या डीआरएम शोभना बंदोपाध्याय आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

या प्रकल्पांचे झाले करार आणि भूमिपूजन

  •  एमआरटीएस अंतर्गत नागपूरहून रामटेक, सावनेर, काटोल, वर्धा, भंडाराकरिता ब्रॉडगेज मेट्रो फीडर सर्व्हिस शुरू करण्यासाठी महामेट्रो, रेल्वे आणि राज्य शासनादरम्यान सामंजस्य करार.
  •  वेकोलिच्या पाच कोळसा खाणीतून पाईप कन्वेअरद्वारे कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाला कोळशाचा पुरवठा करण्यासंबंधीच्या कामाचे भूमिपूजन.
  •  भांडेवाडी एसटीपीमध्ये प्रक्रियाकृत १५० एमएलडी पाणी कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाला देण्यासाठी पुनर्प्रक्रिया प्रकल्प, पम्पिंग स्टेशन व पाईपलाईनच्या कामाचे डिजिटल भूमिपूजन.
  •  भांडेवाडी येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे डिजिटल भूमिपूजन.
  •  वेकोलिच्या भानेगांव कोळसा खाणीतील पाणी खापरखेडा वीज केंद्राला देण्यासंदर्भात करार. 
  •  खाणीतील पाण्याच्या वितरणासाठी वेकोलि आणि विदर्भ सिंचन विकास महामंडळ यांच्यात करार.

 

Web Title: Broad-gauge Metro Feeder Service in Mumbai on the base of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.