ब्रान्डेड बॉटलमध्ये भरली जात होती स्वस्त दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:17 AM2019-05-12T00:17:23+5:302019-05-12T00:18:24+5:30

बेलतरोडी येथील गोटाळ पांजरी येथील एका फ्लॅटमध्ये धाड टाकून पोलिसांनी नकली दारू बनविणारा अड्डा उघडकीस आणला. येथे ब्रान्डेड विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये मध्य प्रदेशातील स्वस्त दारू भरली जात होती. पोलिसांनी येथून तीन आरोपींना अटक केली.

Branded bottle was being filled in cheap liquor | ब्रान्डेड बॉटलमध्ये भरली जात होती स्वस्त दारू

ब्रान्डेड बॉटलमध्ये भरली जात होती स्वस्त दारू

Next
ठळक मुद्देनागपूरच्या बेलतरोडीतील गोटाळ पांजरी येथील अड्ड्यावर धाड : तीन आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेलतरोडी येथील गोटाळ पांजरी येथील एका फ्लॅटमध्ये धाड टाकून पोलिसांनी नकली दारू बनविणारा अड्डा उघडकीस आणला. येथे ब्रान्डेड विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये मध्य प्रदेशातील स्वस्त दारू भरली जात होती. पोलिसांनी येथून तीन आरोपींना अटक केली.
पवन गोवर्धनदास जुमनानी (२२) रा. राजनांदगाव, लालबाग सिंधी कॉलनी, अजय अनिंद्र भालाधरे (२२) रा. गोंदिया आणि अंजार हक ऊर्फ समीर वाहिदुल हक (२६) रा. लोधीपुरा, गणेशपेठ, अशी आरोपींची नावे आहेत. बेलतरोडी पोलिसांना गोटाळ पांजरीमधील कस्तुरीनगर येथील अपार्टमेंटमधील ५ नंबरच्या फ्लॅटमध्ये नकली दारूच्या पॅकिंगचा अड्डा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तलवारे यांच्या नेतृत्वात शनिवारी मध्यरात्री ३ वाजता फ्लॅटवर धाड टाकण्यात आली. आरोपींनी हा फ्लॅट लता सिंह बैस यांच्याकडून भाड्याने घेतला होता. धाडीदरम्यान ब्रान्डेड विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये मध्य प्रदेशातील बॉम्बे स्पेशल व्हिस्की नावाची स्वस्त दारू भरली जात होती. यासोबतच ब्रान्डेड दारूच्या बॉटलमध्ये कॉफीच्या कलर ड्रॉपरच्या मदतीने रंग टाकले जात होते. या अड्ड्यावर प्लास्टिक आणि
अ‍ॅल्युमिनियमची झाकणे मोठ्या प्रमाणावर आढळून आली. ब्रान्डेड बॉटलमध्ये स्वस्त दारू टाकून त्यात रंग मिसळवून दारूचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात होता. अड्ड्यावरून रिकाम्या बॉटल, नेस कॉफीचे पॅकेट, ब्रान्डेड दारूचे लेबल, झाकण आणि ड्रॉपरसह लिक्विड, कत्था, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाख ४२ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. आरोपींची कार, बाईकसुद्धा जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप साळुंखे, हवालदार अविनाश ठाकरे, विजय श्रीवास, गोपाल देशमुख, रितेश ढेंगे, सुरेंद्र पगारे, मिलिंद पटले, नितीन बावणे, प्रशांत सोनुलकर, कुणाल लांडगे आदींनी केली.
दारू तस्करीचे आरोपी अटकेत : विदेशी दारूच्या २५ पेट्या जप्त
नागपूरवरून वर्धेला दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपीस अजनी पोलिसांनी वर्धेतून अटक केली.
जुनेद शेख करीम शेख (२१) रा. वर्धा आणि गाडी चालक संजय ऊर्फ लाल सुनीलराव बाराहो (२९) रा. सेलू अशी आरोपीची नावे आहे. बुधवारी रात्री अजनी पोलिसांची चमू पीएसआय एस.बी. चप्पे यांच्या नेतृत्वात गस्त घालत होती. यादरम्यान कार क्रमांक एमएच/०२/बीजी/१६७० मधून नरेंद्र चौकातून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू वर्धेला नेली जात असल्याची माहिती या टीमला मिळाली. पोलीस नरेंद्रनगरातील श्रीनगर चौकात नजर ठेवून होते. दरम्यान त्यांना संबंधित कार दिसून आली तेव्हा त्याला थांबण्याचा इशारा केला. परंतु कार चालक गाडी न थांबवता पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून कारला पकडले. आरोपी कार सोडून पळाले. करमधून बीअर आणि विदेशी दारूच्या २५ पेट्या जप्त करण्यात आल्या. कारच्या आधारावर पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेतला. गुरुवारी त्यांना वर्धेतील वॉर्ड नंबर १५ येथून जुनेद व सेलू येथून वाहन चालक संजयला अटक करून नागपूरला आणले.

 

Web Title: Branded bottle was being filled in cheap liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.