‘भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्रच लढणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 04:40 AM2018-06-17T04:40:39+5:302018-06-17T04:40:39+5:30

येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक कार्यकर्ता या नात्याने शनिवारी व्यक्त केला.

'BJP-Shiv Sena will fight back together' | ‘भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्रच लढणार’

‘भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्रच लढणार’

googlenewsNext

नागपूर : येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक कार्यकर्ता या नात्याने शनिवारी व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, सरकार म्हणून शिवसेना- भाजपासोबतच आहे. त्यांचा कुठलाही त्रास नाही. येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर त्याला अजून खूप वेळ आहे. राजकारणात तासात परिस्थिती बदलत असते. केवळ सत्ता आणि घराणेशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते तर मग एकाच विचारांनी प्रेरित पक्ष का एकत्र येऊ शकत नाही?

भाजपा-शिवसेना हे एकाच विचारांचे आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येतील, असा मला विश्वास वाटतो. एचएमटी तांदळाचे जनक दिवंगत दादाजी खोब्रागडे यांना पाच कोटीची मदत भाजपा सरकार करू शकली नसल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच केली. याबाबत मुनगंटीवार म्हणाले, हे वक्तव्य म्हणजे या शतकातील सर्वात मोठा जोक आहे. दादाजींचे संशोधन हे काही आजकालचे नाही. अनेक वर्षांपासूनच आहेत. तेव्हा राज्यात काँग्रेसचेच सरकार होते, त्यांनी तेव्हा दादाजींना मदत का केली नाही?
>पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार
येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Web Title: 'BJP-Shiv Sena will fight back together'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.