दुचाकींना ‘सीबीएस’ व ‘एबीएस’ प्रणालीची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:36 AM2019-03-23T00:36:04+5:302019-03-23T00:37:47+5:30

दुचाकी वाहनातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी १०० ते १२५ सीसी इंजिनच्या दुचाकी वाहनांना ‘कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम’ (सीबीएस) तर १२५सीसी इंजिनवरील वाहनांना ‘अ‍ॅण्टीलॉक ब्रेकिंग सिस्टीम’ (एबीएस) बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून नवीन वाहनांसाठी याची सक्ती केंद्राकडून करण्यात आली आहे. परंतु राज्य परिवहन विभागाकडून याबाबत अद्यापही स्पष्ट सूचना नाहीत.

Bicyclists 'CBS' and 'ABS' system compulsory | दुचाकींना ‘सीबीएस’ व ‘एबीएस’ प्रणालीची सक्ती

दुचाकींना ‘सीबीएस’ व ‘एबीएस’ प्रणालीची सक्ती

Next
ठळक मुद्दे१ एप्रिलपासून होणार लागू : अपघाताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकी वाहनातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी १०० ते १२५ सीसी इंजिनच्या दुचाकी वाहनांना ‘कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम’ (सीबीएस) तर १२५सीसी इंजिनवरील वाहनांना ‘अ‍ॅण्टीलॉक ब्रेकिंग सिस्टीम’ (एबीएस) बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून नवीन वाहनांसाठी याची सक्ती केंद्राकडून करण्यात आली आहे. परंतु राज्य परिवहन विभागाकडून याबाबत अद्यापही स्पष्ट सूचना नाहीत.
रस्ता अपघातात दुचाकी वाहनांच्या अपघाताचे प्रमाण मोठे आहे. हे टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने १६ मार्च २०१६ रोजी ‘एबीएस’ किंवा ‘सीबीएस’ प्रणाली बसविण्याच्या सूचना मंत्रालयाकडून दिल्या होत्या. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर काही राज्यात ही प्रणाली राबविण्यात आली. आता १ एप्रिल २०१९ पासून ज्या दुचाकी वाहनांचे उत्पादन होईल त्यात ही प्रणाली बसविणे अनिवार्य होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, वाहन डीलर्सला २०२० पर्यंत जुन्या ब्रेक प्रणालीची सर्व वाहने विक्रीस काढावी लागणार आहे.
काय आहे ‘एबीएस’ प्रणाली
जुन्या वाहनांमध्ये असलेला ब्रेक दाबल्यास चाक ‘लॉक’ होऊन वाहन घसरण्याची भीती असते. परंतु ‘एबीएस’मुळे पुढील आणि मागील चाकाच्या ब्रेकमध्ये समन्वय साधला जातो. परिणामी गाडी घसरत नाही. रस्ता ओला असेल किंवा घसरण्याची शक्यता अधिक असेल किंवा गाडी उलटल्यास या यंत्रणेमुळे अपघात टाळणे शक्य होते. १२५सीसी इंजिनवरील नव्या वाहनांना ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे.
अशी आहे ‘सीबीएस’ प्रणाली
अनेक वाहन चालक आपल्या अनुभवानुसार दुचाकीला ब्रेक लावताना मागील व पुढील ब्रेक एकाचवेळी दाबतात. यामुळे गाडी घसरण्याची शक्यता कमी होते. परंतु प्रत्येकाला असा ब्रेक लावणे शक्य होत नाही. यासाठी ‘कम्बाईंड ब्रेकिंग सिस्टीम’ आली आहे. ही प्रणाली लावल्यावर पुढील व मागील चाकावरील दाब समान करीत असल्याने वाहन घसरून अपघाताची शक्यता कमी होते. ही यंत्रणा १०० ते १२५ सीसी इंजिनच्या सर्व नव्या दुचाकी वाहनांसाठी सक्तीची करण्यात आली आहे.
उत्पादित दुचाकींसाठी अनिवार्य
१ एप्रिल २०१९ पासून ज्या दुचाकी वाहनांचे उत्पादन होईल त्यात ‘सीबीएस’ किंवा ‘एबीएस’ प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीलर्सला ३१ मार्च २०२० पर्यंत जुन्या ब्रेकची दुचाकी वाहने विक्रीस काढावी लागणार आहेत.
उमेश पाटणी
सदस्य, विदर्भ ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशन

Web Title: Bicyclists 'CBS' and 'ABS' system compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.