नागपुरात नोटाबंदीच्या विरोधात भारिपची निदर्शने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:04 AM2018-11-10T00:04:30+5:302018-11-10T00:06:29+5:30

८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यानिमित्त भारिप बहुजन महासंघाने नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करीत हा दिवस काळा दिन म्हणून पाळला. संविधान चौकात निदर्शने करून आपला विरोध दर्शविला.

BHARIP demonstrations against demonetization in Nagpur |  नागपुरात नोटाबंदीच्या विरोधात भारिपची निदर्शने 

 नागपुरात नोटाबंदीच्या विरोधात भारिपची निदर्शने 

Next
ठळक मुद्देसंविधान चौक : काळा दिन म्हणून पाळला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यानिमित्त भारिप बहुजन महासंघाने नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करीत हा दिवस काळा दिन म्हणून पाळला. संविधान चौकात निदर्शने करून आपला विरोध दर्शविला.
भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे, शहर अध्यक्ष रवी शेंडे आणि जिल्हाध्यक्ष नीतेश जंगले यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातातील फलकाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात तन्हा नागपुरी, राजू मेश्राम, भरत लांडगे, आनंद चवर, नालंदा गणवीर, राजेश जंगले, रवि वंजारी, प्रणिता शेंडे, हरीश नारनवरे, नंदिनी सोनी, माया शेंडे, बालू हरकंडे, निर्भय बागड़े, धर्मपाल वंजारी, गौतम पिल्लेवान, भोला शेंडे, विशाल वानखेड़े, गणेश नितनवरे, राजेश चोखाद्रे, भोजराज नंदागवळी, सूरज वानखेडे, अभिजित पडधान, गौतम शेंडे, आनंद बागडे, किशोर खोब्रागड़े, रमेश कांबळे, नरेश गोटेकर, सुमित शेंडे, सुमेध गेडाम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: BHARIP demonstrations against demonetization in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.