नागपूर - पांढुर्णा दरम्यान महिला टीटीईला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:24 AM2018-08-14T00:24:21+5:302018-08-14T00:25:26+5:30

तिकीट विचारल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी तिकीट निरीक्षकाला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये पांढुर्णा ते नागपूर दरम्यान घडली. नागपुरात गाडी आल्यानंतर संबंधित टीटीईने लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली.

In between Nagpur - Pandhurna Woman TTE beat up | नागपूर - पांढुर्णा दरम्यान महिला टीटीईला मारहाण

नागपूर - पांढुर्णा दरम्यान महिला टीटीईला मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देअसभ्य वागणूक : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिकीट विचारल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी तिकीट निरीक्षकाला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये पांढुर्णा ते नागपूर दरम्यान घडली. नागपुरात गाडी आल्यानंतर संबंधित टीटीईने लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली.
लक्ष्मीनारायण किसनलाल सोनी (५५) असे त्या टीटीईचे नाव आहे. १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये पांढुर्णा ते नागपूर दरम्यान तिकीट तपासणी करीत होते. दरम्यान, या तिकीट तपासणी पथकात शालिनी मीना (टीटीई) यासुद्धा होत्या. पांढुर्णाहून गाडी सुटल्यानंतर एस-९ या कोचमध्ये काही तरुण दानापूर ते सिकंदराबाद असा प्रवास करीत होते. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ते रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा देऊन घरी जात होते. दरम्यान, टीटीई शालिनी मीना एस-९ कोचमध्ये गेल्या. झोपेत असलेल्या एका प्रवाशाला त्यांनी तिकीट विचारल्यावरून वादाला सुुरुवात झाली. टीटीईने त्याच्या गालावर मारून उठवले असा प्रवाशांनी आरोप केला. कोचमध्ये बहुतांश परीक्षार्थीच असल्याने त्यांनी महिला टीटीईला घेराव घातला. दरम्यान, दुसऱ्या कोचमध्ये असलेले टीटीई
लक्ष्मीनारायण सोनी हे एस-९ कोचमध्ये पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, तरुणांपैकी एकाने त्यांना मारहाण केली. तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे ते प्रतिकार करू शकले नाही. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर येताच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार नोंदविली. लोहमार्ग पोलिसांनी मारहाण करणाºया प्रवाशांवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्मचाºयावर हल्ला करणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
तोतया टीटीई असल्याची अफवा
टीटीई शालिनी मीना एस ९ कोचमध्ये तिकीट तपासणीस गेल्यानंतर या कोचमधील परीक्षार्थ्यांनी त्या तोतया टीटीई असल्याची अफवा पसरवून याबाबत रेल्वेच्या १८२ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली. टीटीईला रेल्वे प्रशासनातर्फे विशिष्ट रक्कम गोळा करण्याचे टार्गेट दिले जाते. अनेकदा तिकीट नसलेले प्रवासी वाद घालतात. त्यामुळे धावत्या गाडीत टीटीईच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 

Web Title: In between Nagpur - Pandhurna Woman TTE beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.