बंदी असलेल्या प्लास्टिकची गुजरातमधून आयात : कारवाईत उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:58 PM2018-10-11T21:58:07+5:302018-10-11T22:01:41+5:30

महाराष्ट्र शासनाने उत्पादन व वापरावर बंदी घातलेल्या प्लास्टिकची गुजरात राज्यातून नागपूरसह विदर्भात मोठ्या प्रमाणात आयात के ली जाते. गुरुवारी दुपारच्या सुमारास महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने वर्धमाननगर येथील बालाजी गोल्डन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामावर छापा घालून गुजरातमधून आयात केलेला प्लास्टिकचा २३०० किलोचा साठा जप्त केला.

Banned plastic imported from Gujarat: Exposed in action | बंदी असलेल्या प्लास्टिकची गुजरातमधून आयात : कारवाईत उघड

बंदी असलेल्या प्लास्टिकची गुजरातमधून आयात : कारवाईत उघड

Next
ठळक मुद्देट्रान्सपोर्ट कंपनीतून २३०० किलो माल जप्तमनपा व प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाने उत्पादन व वापरावर बंदी घातलेल्या प्लास्टिकची गुजरात राज्यातून नागपूरसह विदर्भात मोठ्या प्रमाणात आयात के ली जाते. गुरुवारी दुपारच्या सुमारास महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने वर्धमाननगर येथील बालाजी गोल्डन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामावर छापा घालून गुजरातमधून आयात केलेला प्लास्टिकचा २३०० किलोचा साठा जप्त केला.
नागपूर शहरात बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर सर्रास सुरू आहे. बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची गुजरातसह अन्य राज्यातून आयात केली जाते. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमधून हा माल आणला जातो. याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार लकडगंज झोनच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने लकडगंज पोलिसांच्या मदतीने गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बालाजी गोल्डन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामावर छापा घातला. येथे ट्रकमधून उतरवीत असलेला प्लास्टिकचा १० लाख किमतीचा २३०० किलो माल जप्त केला. तसेच कंपनीला पाच हजारांचा दंड आकारण्यात आला. ही ट्रान्सपोर्ट कंपनी मनोज शिवकानी यांची असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही कारवाई लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, झोनचे आरोग्य अधिकारी वामन ताईकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, लकडगंज पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पथकाने केली.

Web Title: Banned plastic imported from Gujarat: Exposed in action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.