यंदा भरपावसात वाजणार बॅण्डबाजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:09 AM2018-06-19T10:09:53+5:302018-06-19T10:10:04+5:30

मुहूर्त पाहून लग्न करणाऱ्यांसाठी या सपंूर्ण वर्षात १८ जूनपासून केवळ २४ शुभ मुहूर्त आहेत.

Bandabajasaha this year! | यंदा भरपावसात वाजणार बॅण्डबाजा!

यंदा भरपावसात वाजणार बॅण्डबाजा!

Next
ठळक मुद्देलग्नाचे जूनमध्ये ९ तर जुलैमध्ये १२ मुहूर्त २३ जुलैपासून देवशयनी एकादशी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अधिकमास संपल्यानंतर लग्न मुहूर्ताला सुरुवात झाली आहे. १४ व १५ जून रोजी मध्यम मुहूर्तानंतर १८ जूनपासून शुभ मुहूर्ताला सुरुवात झाल्याने लग्न समारंभाला सुरुवात झाली आहे. २० जुलैपर्यंत विवाह समारंभ होतील. २३ जुलैला देवशयनी एकादशी आहे. तेव्हापासून नोव्हेंबरपर्यंत मंगल कार्य करता येणार नाही. डिसेंबरमध्ये केवळ तीनच शुभ मुहूर्त आहेत. मुहूर्त पाहून लग्न करणाऱ्यांसाठी या सपंूर्ण वर्षात १८ जूनपासून केवळ २४ शुभ मुहूर्त आहेत.
याबाबत पं. उमेश तिवारी यांनी सांगितले की, अधिकमासात वैवाहिक कार्य होत नाही. त्यामुळे ते संपल्याने पुन्हा मंगल कार्याला सुरुवात झाली आहे. यावर्षी मुहूर्त कमी आहे. त्यामुळे मंगल कार्य करणाऱ्या इच्छुकांना तिथीची निवड करण्यास खूप त्रास होत आहे. वर्षाच्या शेवटपर्यंत केवळ २४ मुहूर्त आहेत.

या तिथीमध्ये विवाह योग
जून महिन्यात १८, १९, २०, २१, २३, २५, २७, २९ आणि ३० तारखेला विवाहाचे मुहूर्त आहे. यानंतर जुलैमध्ये ४, ५, ६, ९, १०, ११ आणि १५ तारखेचे मुहूर्त सर्वोत्तम आहेत. तर याच महिन्यात १६, १७, १८, १९ आणि २० जुलैला मध्यम मुहूर्त आहेत.

फेब्रुवारी २०१९ मध्ये २८ दिवसात १६ मुहूर्त
२०१९ मध्ये जानेवारी ते मार्चपर्यंत एकूण ३४ शुभ मुहूर्त आहेत. जानेवारीमध्ये ११ मुहूर्त आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात १६ आणि मार्चमध्ये केवळ ७ मुहूर्त आहेत. यात जानेवारी महिन्यात १७, १८, २२, २३, २४, २५, २६, २७, २९, ३० आणि ३१ तारीख शुभ आहे. फेब्रुवारी महिन्यात २८ दिवसात १६ मुहूर्त आहेत. १, २, ३, ८, ९, १०, १३, १४, १५, १९, २१, २२, २३, २४, २५ आणि २८ फेब्रुवारी रोजी मंगल कार्य केले जाऊ शकते. मार्चमध्ये २, ७, ८, ९, १२, १३ आणि १४ तारीख शुभ आहे.

तारा अस्त आणि पौष माह
देवउठनी एकदशी १९ नोव्हेंबरला आहे. परंतु तारा अस्त होत असल्याुळे यानंतर लगेच कुठलाही मुहूर्त नाही. ज्योतिषांच्यानुसार विवाह मुहूर्त शोधत असताना त्रिबल शुद्धीसह गुरु-शुक्रास्त यांचाही विचार करणे आवश्यक असते. या दोन्ही ग्रहांचा अस्त होणे दाम्पत्यांसाठी नुकसानकारक मानले गेले आहे.
विवाह मुहूर्त काढताना जर गुरू व शुक्र अस्त प्रारुपमध्ये असतील तर विवाह शुभ मानला जात नाही. गुरू व शुक्राच्या उदयानंतर डिसेंबर २०१८ मध्ये शुभ मुहूर्त राहील. त्याचप्रकारे १६ डिसेंबरनंतर पौष मास सुरू होईल. यातही मंगल कार्य होणार नाही. जानेवारी २०१९ मध्ये विवाह योग आहे. यानंतर १५ मार्च २०१९ पासून मीन राशीचे सूर्य असल्याने खरमासमध्ये मुहूर्त नाहीत. १४ एप्रिलपर्यंत वैवाहिक कार्य होणार नाही.

Web Title: Bandabajasaha this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न