भाजपा नेते  मुन्ना यादव यांचा जामीन अर्ज खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 09:27 PM2018-03-15T21:27:12+5:302018-03-15T21:27:23+5:30

सत्र न्यायालयाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता भाजपा नेते मुन्ना यादव व त्यांचे बंधू बाला यादव यांना खुनी हल्ला प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज खारीज करण्यात आले. न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी हा निर्णय दिला.

Bail application of BJP leader Munna Yadav rejected | भाजपा नेते  मुन्ना यादव यांचा जामीन अर्ज खारीज

भाजपा नेते  मुन्ना यादव यांचा जामीन अर्ज खारीज

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालय : बाला यादवलाही दणका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता भाजपा नेते मुन्ना यादव व त्यांचे बंधू बाला यादव यांना खुनी हल्ला प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज खारीज करण्यात आले. न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी हा निर्णय दिला.
ही घटना २१ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री घडली होती. फिर्यादी अवधेश ऊर्फ पापा नंदलाल यादव यांच्या तक्रारीनुसार, मुन्ना यादव यांची मुले करण व अर्जुन फटाके फोडत असताना त्यांना फिर्यादीच्या कुटुंबातील मंजू यादव यांनी हटकले. त्यामुळे मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांनी फिर्यादीच्या कुटुंबीयांना शस्त्राने जखमी केले. तसेच, जबर मारहाण व शिवीगाळ केली. जखमींमध्ये सत्यप्रकाश ऊर्फ मंगल नंदलाल यादव, प्रदीप ऊर्फ गब्बर नंदलाल यादव, मंजू संतोष यादव व अवधेश यादव यांचा समावेश आहे. धंतोली पोलिसांनी मुन्ना यादव, लक्ष्मी यादव, करण यादव, अर्जुन यादव, बाला यादव, जग्गू यादव, सोनू यादव व इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला. गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल केले आहे. आरोपींतर्फे अ‍ॅड. उदय डबले यांनी बाजू मांडली.

Web Title: Bail application of BJP leader Munna Yadav rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.