मनपाच्या नावावर होणार थकबाकीदारांच्या मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 08:34 PM2019-06-19T20:34:23+5:302019-06-19T20:35:53+5:30

शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांची विक्री सुरू केली आहे. काही मालमत्तांना लिलावात प्रतिसाद मिळाला नाही, अशा मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच थकबाकीदारांच्या मालमत्ता महापालिकेच्या नावावर होणार आहे.

The assets of the defaulters will be held in the name of Nagpur Municipal Corporation | मनपाच्या नावावर होणार थकबाकीदारांच्या मालमत्ता

मनपाच्या नावावर होणार थकबाकीदारांच्या मालमत्ता

Next
ठळक मुद्देस्थायी समितीची मंजुरी : लिलावात अपेक्षित प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांची विक्री सुरू केली आहे. काही मालमत्तांना लिलावात प्रतिसाद मिळाला नाही, अशा मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच थकबाकीदारांच्या मालमत्ता महापालिकेच्या नावावर होणार आहे.
वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रकारची कारवाई केली. थकबाकीदारांना वॉरंट बजावले, जप्तीची कारवाई करून लिलाव करण्यात आला. मात्र यानंतरही थकबाकीदारांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अशा मालमत्ता आता महापालिके च्या नावावर केल्या जाणार आहते.
हनुमाननगर झोनमधील वॉर्ड क्रमांक १४ मधील घर क्रमांक ६६१७/अ‍े /३१, यांच्याकडे मालमत्ता कर व शास्ती अशी २ लाख ६७ हजार ६९६ रुपयांची थकबाकी आहे. या मालमत्तेच्या लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. घर क्रमांक ६६३७/अ‍े/३७ च्या मालकाकडे कर व शास्ती अशी २ लाख ४० हजार ४५४ रुपये, मिळकत क्रमांक ६६१७/अ‍े/३२ च्या मालकाकडे २ लाख ६७ हजार २९७ रुपये, वॉर्ड क्रमांक १५ मधील घर क्रमांक ३४७६/२६ च्या मालकाकडे ३ लाख ३८ हजार ४६३ रुपये, घर क्रमांक ३४८६/८२ यांच्याकडे १ लाख ७५ हजार, घर क्रमांक ३४८६/७ यांच्याकडे २ लाख ४४ हजार ७३९ रुपये, वॉर्ड १४ मधील घरक्रमांक ६६१७ /अ‍े /८१ च्या मालकाकडे १ लाख ७६ हजार ३२९ रुपये, घर क्रमांक ६६१७/अ‍े/७८ यांच्याक डे १ लाख ९७ हजार, धरमपेठ झोनमधील वॉर्ड क्रमांक ७३ मधील घर क्रमांक ८३३९/बी च्या मालकाकडे ३३ लाख ८९ हजार रुपये थकबाकी  आहे. यासह लिलावात प्रतिसाद न मिळालेल्या मालमत्ता महापालिकेच्या नावावर केल्या जाणार आहेत.
थकबाकीदारांची मालमत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध करून जाहीर लिलाव करण्यात आला. परंतु काही मालमत्तांच्या लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. अशा मालमत्ता महापालिकेच्या नावावर केल्या जाणार आहेत.
१२० मालमत्ता मनपाच्या नावावर होणार
शहराच्या विविध भागातील थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव केला जात आहे. मात्र खरेदीदार उपलब्ध न झालेल्या संपूर्ण शहरातील १२० स्थावर मालमत्ता महापालिकेच्या नावावर करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेतर्फे ही कारवाई नियमित सुरू राहणार आहे. अनेक वर्र्षापासून मालमत्ता कर थकीत असणाऱ्यांना थकबाकी भरण्याची शेवटची संधी दिली जाणार आहे.

 

 

Web Title: The assets of the defaulters will be held in the name of Nagpur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.