कळमन्यात सर्वच बाजारपेठांमध्ये आवक अत्यल्प : सहा दिवस व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:40 PM2019-05-25T22:40:17+5:302019-05-25T22:43:59+5:30

मतमोजणीमुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केड यार्ड चार दिवस बंद होते. या दिवसात बाजारात मालाची आवक आणि खरेदी-विक्री बंद होती. शनिवारपासून व्यवहार सुरू झाले, पण आवक अत्यल्प होती. शनिवारी बँका बंद होत्या, तसेच रविवारी बाजारपेठा पुन्हा बंद राहणार असल्यामुळे व्यवहार सोमवारपासून नियमित सुरू होणार असल्याची माहिती अडतियांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूण सहा दिवसात कळमन्यातील सहा मुख्य बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याचे अडतियांनी सांगितले.

Arrivals in all markets very less: Six days business jam | कळमन्यात सर्वच बाजारपेठांमध्ये आवक अत्यल्प : सहा दिवस व्यवसाय ठप्प

कळमन्यात सर्वच बाजारपेठांमध्ये आवक अत्यल्प : सहा दिवस व्यवसाय ठप्प

Next
ठळक मुद्देसोमवारपासून आवक सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मतमोजणीमुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केड यार्ड चार दिवस बंद होते. या दिवसात बाजारात मालाची आवक आणि खरेदी-विक्री बंद होती. शनिवारपासून व्यवहार सुरू झाले, पण आवक अत्यल्प होती. शनिवारी बँका बंद होत्या, तसेच रविवारी बाजारपेठा पुन्हा बंद राहणार असल्यामुळे व्यवहार सोमवारपासून नियमित सुरू होणार असल्याची माहिती अडतियांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूण सहा दिवसात कळमन्यातील सहा मुख्य बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याचे अडतियांनी सांगितले.
कोट्यवधींचे व्यवहार ठप्प
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी समितीच्या मार्केट यार्डमध्ये २३ मे रोजी पार पडली. पण कायदा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी अणि जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी मार्केट यार्ड २१ मेच्या सायंकाळी ७ पासून २४ मेच्या सायंकाळपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याकरिता बाजारात सुरक्षा यंत्रणातैनात करण्यात आली होती. बाजारात गाड्या जाण्यावर बंदी होती. बंदची माहिती शेतकरी, ग्राहक आणि विक्रेत्यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी २१ मेपासून बाजारात मालाची आवक बंद केली. जवळपास सहा दिवसात खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहिल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प राहिल्याची माहिती अडतियांनी दिली.
दररोज दीड लाख पोती धान्य, कडधान्याच्या विक्रीला फटका
कळमन्यात उन्हाळ्यात धान्याचा हंगाम असतो. या दिवसात दररोज १० हजार पोती हरभरा, चार हजार पोती तूर, दोन हजार पोती सोयाबीन आणि जवळपास ८ ते १० हजार पोती गहू अशी एकूण २४ ते २५ हजार पोती धान्य व कडधान्याची विक्री होते. या सहा दिवसात दीड लाख पोत्यांची विक्री झाली नाही. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांना नुकसान सोसावे लागले. शनिवारी धान्य बाजार सुरू झाल्यानंतर शेतकरी आणि ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली. व्यवहार सोमवारपासून पूर्ववत होतील, असे धान्य बाजाराचे विक्रेते व अडतिये कमलाकर घाटोळे यांनी दिली.
भाजी बाजारात आवक, पण ग्राहक कमी
कळमन्यात धान्य, फळे, मिरची, आलू-कांदे, भाजीपाला, न्यू ग्रेन आदी सहा मुख्य बाजारपेठा आहेत. भाजीपाला बाजारात आवक रात्रीपासून सुरू होते. पण मार्केट यार्ड २४ मे सायंकाळपर्यंत बंद राहिल्यामुळे शनिवार, २५ मे रोजी हव्या त्या प्रमाणात भाजीपाला आला नाही. स्थानिकांकडून आवक होती, पण त्या प्रमाणात ग्राहक नव्हते. त्यामुळे सर्वच भाज्यांचे भाव कमी झाले होते.

Web Title: Arrivals in all markets very less: Six days business jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.