रामदेवबाबा विद्यापीठास मंत्रिमंडळाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 09:43 PM2019-06-11T21:43:25+5:302019-06-11T21:49:20+5:30

विदर्भासह राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सत्र २०१९-२० मध्ये श्री रामदेवबाबा विद्यापीठाची स्थापना होईल. या निर्णयामुळे नागपूर विभागात पहिले स्वायत्त विद्यापीठ स्थापन होईल. हे विद्यापीठ विदर्भातील दुसरे राहिल. त्याचबरोबर पुण्यात श्री बालाजी सोसायटीला स्वायत्त विद्यापीठ स्थापण्याची मंजुरी दिली आहे.

The approval of Ramdev Baba University by cabinet | रामदेवबाबा विद्यापीठास मंत्रिमंडळाची मान्यता

रामदेवबाबा विद्यापीठास मंत्रिमंडळाची मान्यता

Next
ठळक मुद्देसत्र २०१९-२० पासून सुरू करण्याची मिळाली मान्यतानागपूर विभागातील पहिले सेल्फ फायनान्स विद्यापीठ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भासह राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सत्र २०१९-२० मध्ये श्री रामदेवबाबा विद्यापीठाची स्थापना होईल. या निर्णयामुळे नागपूर विभागात पहिले स्वायत्त विद्यापीठ स्थापन होईल. हे विद्यापीठ विदर्भातील दुसरे राहिल. त्याचबरोबर पुण्यात श्री बालाजी सोसायटीला स्वायत्त विद्यापीठ स्थापण्याची मंजुरी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचा शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटने हजारो विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण तांत्रिक शिक्षण दिले असून, देशाच्या विकासात उल्लेखनीय भूमिका पार पाडली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कॉलेजला यापूर्वी २०११ मध्ये स्वायत्तेचा दर्जा प्रदान करण्यात आला होता. कॉलेजला आयएसओ ९००१:२००५ दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर नॅकच्या मूल्यांकनात संस्थेला ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे.
श्री बालाजी सोसायटी पुणे यांच्या माध्यमातून पुण्यातील विद्यापीठाची स्थापना होत आहे. या संस्थेकडून यापूर्वीच व्यवस्थापन, अभियांत्रिकी, विधि हे अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत. स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेनंतर मॉडर्न मॅनेजमेंट, टेलिकॉम मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.
असे होणार लाभ
श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटचे श्री रामदेवबाबा विद्यापीठात रुपांतर झाल्यानंतर नागपूर विभागाबरोबरच संपूर्ण विदर्भाला त्याचा फायदा होणार आहे. विद्यापीठाच्या रूपात संस्थेला पूर्णत: अभ्यासक्रमाचे स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे विद्यापीठ रिसर्चवर आधारीत अभ्यासक्रम व औद्योगिक क्षेत्राच्या मागणीनु सार अभ्यासक्रम सुरु करू शकते. त्याचबरोबर भविष्यातील व जागतिक मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांना तसे शिक्षण उपलब्ध करून देता येऊ शकते. संस्थेला विद्यापीठासारखेच पूर्ण शैक्षणिक व आर्थिक अधिकार मिळतील. विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
२०१७ मध्ये दिला होता प्रस्ताव
यासंदर्भात कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश पांडे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, अद्यापपर्यंत आम्हाला कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र कॉलेजकडून २०१७ मध्ये यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी विविध समित्यांनी कॉलेजचा दौरा केला होता. सरकारच्या सर्वच मापदंडामध्ये कॉलेज योग्य ठरले आहे. ते म्हणाले की, कॉलेजमध्ये सध्या इंजिनिअरिंग, एमबीए व एमसीए अभ्यासक्रम सुरू आहे. विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर योजना आखण्यात येईल. यात कुठले अभ्यासक्रम सुरू करता येईल, हे ठरविण्यात येईल . संशोधनावर आधारीत अभ्यासक्रमाला विशेष प्राधान्य देण्याची त्यांची योजना आहे. त्यामुळे विदर्भातील समस्यांचे अध्ययन होईल. देशाच्या विकासात प्रशिक्षित मानव संसाधन तयार होईल.
श्रेष्ठतेच्या मापदंडाला पूर्ण केले
श्री रामदेवबाबा सार्वजनिक समितीद्वारा संचालित श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटला गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र व देशातही ओळखले जाते. कॉलेजचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय स्तरावर चांगली गुणवत्ता प्रदान केली आहे. मानवसंसाधन विकास मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्युशन रँकिंग फ्रेम वर्क (एनआयआरएफ) मध्ये कॉलेजने उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त केली आहे. कॉलेजच्या कॅम्पस प्लेसमेंटचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. दररवर्षी कॉलेजमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतात. हेच कारण आहे की, दरवर्षी हजारोच्या संख्येने विद्यार्थी येथे प्रवेश घेतात.

Web Title: The approval of Ramdev Baba University by cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.