अर्ज १७२ मंजूर मात्र१३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:00 AM2017-08-22T01:00:15+5:302017-08-22T01:00:47+5:30

नियमांचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही दिल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती स्थापित करण्याला अनुमती दिली जात आहे.

Application form 172 approved only 13 | अर्ज १७२ मंजूर मात्र१३

अर्ज १७२ मंजूर मात्र१३

Next
ठळक मुद्देनियमांच्या कात्रीत अडकले गणेश मंडळ : पोलीस व वाहतुकीची परवानगी घेताना अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नियमांचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही दिल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती स्थापित करण्याला अनुमती दिली जात आहे. महापालिकेच्या सर्व १० झोनमध्ये यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांत १७२ मंडळांनी अर्ज केले. परंतु आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने १३ मंडळांनाच अनुमती देण्यात आली आहे.
स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक विभागाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जात आहे. परंतु पोलीस व वाहतूक विभागाकडून अनुमती घेताना अडचणी येत आहे. अर्धवट सिमेंट रोड, मेट्रो रेल्वे, उड्डाणपुलांची कामे सुरू असल्याने प्रमुख मार्गावर गणेशोत्सवासाठी अनुमती देताना अडचणी येत आहे.
न्यायालयाच्या दिशा-निर्देशानुसार गेल्यावर्षी मंडळासाठी नियमावली तयार करण्यात आली. यावेळी या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी सक्ती केली जात आहे. गेल्यावर्षी १२०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अनुमतीसाठी अर्ज केले होते. यातील ८५० मंडळांनाच आवश्यक दस्तऐवज सादर करणे शक्य झाले. मंडळांना सुविधा व्हावी यासाठी अग्निशमन विभागात याची व्यवस्था करण्यात आली होती. अखेरच्या दिवशी ३०० मंडळांनी अर्ज केले होते. यामुळे अनुमती देताना कर्मचाºयांची दमछाक झाली होती.
याचा विचार करता, यावेळी झोनस्तरावर व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पोलीस व वाहतूक विभागाच्या सक्तीमुळे अद्याप बहुसंख्य मंडळांनी अर्ज केलेले नाही.
कृत्रिम तलावांची सुविधा
२५ आॅगस्टला गणरायांचे आगमन होत आहे. त्यामुळे २३ व २४ आॅगस्टला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणपतींना वाजतगाजत आणले जाणार आहे. चितार ओळ तसेच शहराच्या विविध भागात दुकाने थाटण्यात आलेली आहेत. महापालिका प्रशासनातर्फे गांधीसागर व सोनेगाव तलावाच्या एका बाजूला कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. तसेच फुटाळा व सक्करदरा तलावासह प्रमुख तलावाच्या ठिकाणी विसर्जनाचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात तसेच चौकाचौकात कृत्रिम तलाव ठेवण्यात येणार आहे. प्रभागातही ही सुविधा राहणार आहे.
मूर्ती विक्रे त्यांची होणार चौकशी
प्लास्टर आॅफ पॅरिस (पीओपी) मूर्तीची खरेदी-विक्री करण्यावर राज्य शासनाने निर्देश जारी केलेले आहे. त्यानुसार मूर्तीवर लाल निशाणी लावणे, विसर्जनााठी जनजागृती करणारे बॅनर लावण्याची यात तरतूद आहे. परंतु याचे पालन होत नाही. मूर्ती विक्रेते याचे पालन करतात की नाही, याची शहानिशा करणार असल्याची माहिती महापालिकेचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिली.

Web Title: Application form 172 approved only 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.