नागपूर शहरातील पेट्रोल पंप  बंदचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:22 PM2018-04-30T23:22:29+5:302018-04-30T23:22:43+5:30

१ मे रोजी शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याची घोषणा विदर्भ डीलर्स असोसिएशनने केली आहे. गुरुदेवनगर येथील पंचशील पेट्रोल पंपावर झालेला सशस्त्र दरोडा व चौकीदाराच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी पत्रकाद्वारे सांगितले. दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत सर्व पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Appeal for petrol pump in Nagpur City | नागपूर शहरातील पेट्रोल पंप  बंदचे आवाहन 

नागपूर शहरातील पेट्रोल पंप  बंदचे आवाहन 

googlenewsNext
ठळक मुद्देविदर्भ डीलर्स असोसिएशन घोषणासशस्त्र दरोडा व चौकीदाराच्या निर्घृण हत्येचा  निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :  १ मे रोजी शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याची घोषणा विदर्भ डीलर्स असोसिएशनने केली आहे. गुरुदेवनगर येथील पंचशील पेट्रोल पंपावर झालेला सशस्त्र दरोडा व चौकीदाराच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी पत्रकाद्वारे सांगितले. दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत सर्व पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२९ एप्रिलच्या मध्यरात्री गुरुदेवनगर येथील पंचशील पेट्रोल पंपावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून रोकड लुटली व येथील पहारेकऱ्याचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे पेट्रोल पंप चालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर लुटीच्या इराद्याने सातत्याने हल्ले होत असून, यामुळे पेट्रोल पंप संचालित करणे कठीण आणि जोखमीचे झाले आहे. गुरुदेवनगर येथील पेट्रोल पंप हल्ल्याच्या आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी तसेच अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

Web Title: Appeal for petrol pump in Nagpur City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.