नागपुरात होणार अखिल भारतीय योग संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:17 PM2017-10-27T12:17:12+5:302017-10-27T12:18:49+5:30

योगाभ्यासी मंडळाने १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय योग संमलन आयोजित केले आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष रामभाऊ खांडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

All India Yoga Convention will be held in Nagpur | नागपुरात होणार अखिल भारतीय योग संमेलन

नागपुरात होणार अखिल भारतीय योग संमेलन

Next
ठळक मुद्देजनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे आयोजनस्वामींच्या जयंतीचे १२५ वे वर्ष

आॅनलाईन लोकमत
नागपूर : आधुनिक यंत्र युगातील ताणतणावामुळे मानवाचे समाधान, सुख, निरोगत्व लयास गेले आहे. तो औषधांवर जगण्याचा तकलादू प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मानव जातीच्या निरामय जीवनासाठी योग साधना महत्त्वपूर्ण ठरत आहे. श्री जनार्दन स्वामी महाराजांनी १९५१ पासून नागपूरसह विदर्भातील नागरिकांना योगाभ्यासी मंडळ स्थापन करून अष्टांग योगाच्या मार्गाची सुगमता जनाजनाच्या मनामध्ये बिंबविला. स्वामींच्या १२५ व्या जयंतीचे हे वर्ष आहे.
यानिमित्त जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाने १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय योग संमलन आयोजित केले आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष रामभाऊ खांडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनात जितेंद्रनाथ महाराज, अपर्णा रामतीर्थकर, विवेक घळसासी, अशीत आंबेकर, चारुदत्त आफळे यांचे मार्गदर्शन होणार आहे. रामनगर येथील संघ मैदानावर आयोजित योग संमलनाला पहाटे ४.३० वाजतापासून सुरूवात होणार असून, रात्री १० पर्यंत विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे.
योग साधनेची अनुभूती सकाळच्या योगवर्गात मिळणार आहे. संमलनाच्या निमित्त योगदिंडी काढण्यात येणार आहे. संमेलनाला देशभरातून ५००० योगसाधक उपस्थित राहणार आहे. संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, खासदार विकास महात्मे उपस्थित राहणार आहे. संमेलनात आधुनिक वैद्यकशास्त्र व योगोपचार चर्चा सत्राचेही आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: All India Yoga Convention will be held in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य