अक्षयकुमारच्या चित्रपटात अधिकाऱ्यांचा सहभाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 08:32 PM2018-11-16T20:32:21+5:302018-11-16T20:35:56+5:30

१९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशातून सर्वोत्कृष्ट दहा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तीन राज्याचे सचिव व अभियान संचालकांना केंद्र शासनाच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशनचे विशेष दूत सिनेअभिनेते अक्षय कुमार यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी होऊन संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

Akshaykumar's film officials involved! | अक्षयकुमारच्या चित्रपटात अधिकाऱ्यांचा सहभाग!

अक्षयकुमारच्या चित्रपटात अधिकाऱ्यांचा सहभाग!

Next
ठळक मुद्देस्पर्धेतून होणार निवड : १९ नोव्हेंबरला स्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशातून सर्वोत्कृष्ट दहा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तीन राज्याचे सचिव व अभियान संचालकांना केंद्र शासनाच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशनचे विशेष दूत सिनेअभिनेते अक्षय कुमार यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी होऊन संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत स्वच्छतेसाठी ग्रामीण भागातील कुटुंबांच्या गृहभेटी, जनजागृतीसाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता रॅलीचे आयोजन, हागणदारीमुक्तीचे बोर्ड लावणे, शौचालयाच्या एका खड्ड्याचे दोन खड्ड्यात रुपांतर करणे, सोनखत निर्मितीसाठी जनजागृती, गोबरधन, बायोगॅस युनिट, पायाभूत सर्वेक्षणात सुटलेल्या व वाढीव कुटुंंबात शौचालयाचे बांधकाम, जागतिक शौचालय दिनानिमित्त जनजागृती सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदी उपक्रम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पंचायत समितींमार्फत राबविण्यात येणार आहे. तसेच राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे छायाचित्र, व्हीडीओ आणि इतर माहिती केंद्र शासनाच्या वेबपोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा २०१८ या स्पर्धेत सहभागी होऊन नाविन्यपूर्ण व कल्पक उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
स्पर्धा दहा मुद्यांवर आधारित
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने शौचालयाच्या नियमित वापरासोबत स्वच्छतेच्या सर्वांगीण जनजागृतीसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वच्छ भारत जागतिक शौचालय दिन स्पर्धा २०१८ हे या स्पर्धेचे नाव असून, यात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत. दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत  जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता विषयक उपक्रमांचा दर्जा आणि तीव्रता या मुद्यांवर ही स्पर्धा आधारित आहे. 

Web Title: Akshaykumar's film officials involved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.