विमानाची ‘टच-डाऊन’ प्रॅक्टिस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:27 AM2019-01-10T00:27:07+5:302019-01-10T00:28:10+5:30

बुधवारी इंडिगो एअरलाईन्सच्या नागपूर-हैदराबाद ६ई७१०४ विमानाला दीड तास उशीर झाला. कंपनीच्या या विमानाचा चालक दल पूर्वी ‘टच-डाऊन’ प्रॅक्टिस करणारा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

The aircraft's 'touch-down' practice was canceled | विमानाची ‘टच-डाऊन’ प्रॅक्टिस रद्द

विमानाची ‘टच-डाऊन’ प्रॅक्टिस रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरात  इंडिगोच्या उड्डाणांना दीड ते तीन तास उशीर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी इंडिगो एअरलाईन्सच्या नागपूर-हैदराबाद ६ई७१०४ विमानाला दीड तास उशीर झाला. कंपनीच्या या विमानाचा चालक दल पूर्वी ‘टच-डाऊन’ प्रॅक्टिस करणारा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विमानाला नागपुरात पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे नागपूर-हैदराबाद विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान नागपुरात येण्यास आणि हैदराबाद येथे उड्डाणादरम्यान वैमानिकांची टच-डाऊनची पॅ्रक्टिस पूर्वी निश्चित होती. पण उशीर झाल्यामुळे अभ्यास रद्द करण्यात आला. टच-डाऊन प्रॅक्टिसमध्ये वैमानिक विमान चालविताना धावपट्टीजवळ आणतात, पण लॅण्डिंगऐवजी पुन्हा आकाशात नेतात. हा अभ्यास निश्चित वेळेत सुरू असतो. बुधवारी सायंकाळी ७.४५ वाजता दीड तास उशीराने प्रवाशांच्या बोर्डिंगसह विमानाने हैदराबादकडे उड्डाण भरले. या विमानासह इंडिगोच्या नागपूर-चेन्नई विमानाला तीन तास उशीर झाला. सायंकाळी ५.२५ ऐवजी रात्री ८.१८ वाजता रवाना झाले. तर बेंगळुरू-नागपूर विमान तीन तास उशीरा आले. या संदर्भात इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी ठोस कारण सांगितले नाही.
एअर इंडियाची दोन विमाने लेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या विमानांना उशीर झाल्यामुळे बुधवारी एअर इंडियाच्या दोन विमानांनी उशीरा उड्डाण भरले. एआय ६२७ मुंबई-नागपूर विमान १.१५ मिनिटे उशीरासह रात्री ८.३५ वाजता पोहोचले. याशिवाय एआय६२९ मुंबई-नागपूर विमान ४५ मिनिटे उशीरा आले.

Web Title: The aircraft's 'touch-down' practice was canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.