एअर इंडियाचे मुंबई-नागपूर विमान ‘लेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 12:15am

एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानाला शुक्रवारी रात्री येण्यास उशीर झाल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंसह १५० प्रवासी मुंबई विमानतळावर अडकून पडले. विमानाला विलंब झाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला.

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानाला शुक्रवारी रात्री येण्यास उशीर झाल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंसह १५० प्रवासी मुंबई विमानतळावर अडकून पडले. विमानाला विलंब झाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला. वृत्त लिहिपर्यंत एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना विमान कधी येईल हे सांगितले नाही. परंतु विमानतळावरच रात्र काढावी लागू शकते याचे संकेत प्रवाशांना दिले. अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तर न मिळाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला. मुंबईत राज्यभरातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सहभागी होण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर गेले होते. डॉ. कल्याणकर सायंकाळी ५.३० वाजता दुसºया कंपनीच्या विमानाने मुंबईवरून नागपुरात आले. परंतु डॉ. काणे व डॉ. चांदेकर यांनी एअर इंडियाच्या रात्री ७ वाजताच्या विमानाने नागपूरला येण्याचे ठरविले होते. डॉ. काणे यांनी सांगितले की, त्यांना आधी विमानाला ४५ मिनिट उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विमानाला बराच वेळ झाला. दरम्यान विमान रात्री ९.३० वाजता येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु तरीही विमान आले नाही. प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर त्यांना रात्रीचे जेवण विमानतळावर देण्यात आले. सोबतच विमानतळावर रात्र काढावी लागू शकते असा संकेत प्रवाशांना देण्यात आला. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी रात्री ११ वाजता विमान येणार असल्याचे सांगितले. वृत्त लिहिपर्यंत विमान आलेले नव्हते.

संबंधित

आरोग्यातील अव्यवस्था आणखी किती बळी घेणार?
आकांक्षित जिल्हा रिक्तपदांनी खिळखिळा
दाभोलकर हत्याप्रकरण: दोषारोपपत्रासाठी सीबीआयला मुदतवाढ, ४५ दिवसांचा अवधी
नागपूर मनपाला जीएसटीचे वर्षाकाठी १०३८ कोटी
मॅरेथॉन बैठकीत काँग्रेसने घेतला राजकीय आढावा; पक्षनेत्यांचा उत्साह वाढल्याचे चित्र

नागपूर कडून आणखी

आरोग्यातील अव्यवस्था आणखी किती बळी घेणार?
आकांक्षित जिल्हा रिक्तपदांनी खिळखिळा
दाभोलकर हत्याप्रकरण: दोषारोपपत्रासाठी सीबीआयला मुदतवाढ, ४५ दिवसांचा अवधी
नागपूर मनपाला जीएसटीचे वर्षाकाठी १०३८ कोटी
मॅरेथॉन बैठकीत काँग्रेसने घेतला राजकीय आढावा; पक्षनेत्यांचा उत्साह वाढल्याचे चित्र

आणखी वाचा