प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते : रमेश मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:16 PM2019-06-17T22:16:44+5:302019-06-17T22:19:10+5:30

भारतात ‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा’असे संबोधले जाते. समाजात आजही डॉक्टरला देवमाणूस, देवदूत, ईश्वर अशी विशेषणे लावून त्यांची महती वर्णिली जाते. परंतु याउलट अमेरिका, इंग्लंड यासारख्या प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते. यामुळे डॉक्टर-रुग्ण या नात्याकडे पुन्हा पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवादासोबतच संवेदनशीलता वाढण्याची आणि माणुसकीशी बांधिलकी मानून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा आदर करण्याची मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी डॉक्टर व रुग्णांमधील संवाद हा सुसंवाद असायाला हवा, असे मत ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजीन’चे (बीएपीआयओ) अध्यक्ष व ‘जीएपीआयओ’चे जागतिक अध्यक्ष डॉ. रमेश मेहता यांनी येथे व्यक्त केले.

In the advanced country, the patient is considered as God: Ramesh Mehta | प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते : रमेश मेहता

पत्रपरिषदेत माहिती देताना डॉ. रमेश मेहता, सोबत डॉ. प्रकाश खेतान, डॉ. अशोक खंडेलवाल, डॉ. उदय बोधनकर, डॉ. राजू खंडेलवाल, डॉ. शरद देशमुख व डॉ. निर्मल जयस्वाल.

Next
ठळक मुद्देरुग्ण-डॉक्टरांमध्ये संवादासोबतच संवेदनशीलता वाढण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात ‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा’असे संबोधले जाते. समाजात आजही डॉक्टरला देवमाणूस, देवदूत, ईश्वर अशी विशेषणे लावून त्यांची महती वर्णिली जाते. परंतु याउलट अमेरिका, इंग्लंड यासारख्या प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते. यामुळे डॉक्टर-रुग्ण या नात्याकडे पुन्हा पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवादासोबतच संवेदनशीलता वाढण्याची आणि माणुसकीशी बांधिलकी मानून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा आदर करण्याची मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी डॉक्टर व रुग्णांमधील संवाद हा सुसंवाद असायाला हवा, असे मत ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजीन’चे (बीएपीआयओ) अध्यक्ष व ‘जीएपीआयओ’चे जागतिक अध्यक्ष डॉ. रमेश मेहता यांनी येथे व्यक्त केले.
‘ग्लोबल असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजीन’तर्फे (जीएपीआयओ) ‘अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस’, नागपूरच्यावतीने दहावी वार्षिक परिषद ‘गॅपीओ-२०२०’ चे आयोजन ३ ते ५ जानेवारी २०२० मध्ये नागपुरात करण्यात आले आहे. या परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ‘जीएपीआयओ’च्या ब्रिटन शाखेचे संचालक डॉ. अशोक खंडेलवाल, डॉ. उदय बोधनकर, डॉ. राजू खंडेलवाल, डॉ. निर्मल जयस्वाल, डॉ. शरद देशमुख, डॉ. प्रकाश खेतान, डॉ. हरीश वरभे आदी उपस्थित होते.
रुग्णाशी संवाद साधण्याचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक
डॉ. मेहता म्हणाले, साडेचार वर्षांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शरीरविज्ञानाच्या बारीकसारीक बाबींसोबतच डॉक्टरांना रुग्णांशी संवाद कसा साधायचा, याचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा फॅमिली डॉक्टर ही संकल्पना रुजविण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
डॉक्टर-रुग्णांमध्ये विश्वास रुजविण्याची गरज : डॉ. खंडेलवाल
डॉ. अशोक खंडेलवाल म्हणाले, डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे. हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये वेळेची गरज आहे. परंतु ही वेळच डॉक्टर आणि रुग्णांकडे नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटते. यामागील कारणांचा शोध घेतला असता, अनेकदा रुग्णाला त्याच्यावर नेमके काय उपचार केले जात आहेत, त्याची माहिती मिळत नाही. डॉक्टर आपल्या रुग्णाला पाहत नाहीत, हा त्यांचा गैरसमज संवादातून दूर करता येतो. पण डॉक्टरांना प्रत्येक रुग्णासोबत आणि त्याच्या नातेवाईकांसोबत संवादासाठी वेळ देणे दुरापास्त होते. यामुळे यातून मार्ग काढणे म्हणजेच दोघांमध्ये संवाद घडवून आणणे आवश्यक झाले आहे.

Web Title: In the advanced country, the patient is considered as God: Ramesh Mehta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.