नागपुरात परवान्याविना मद्य विकणाऱ्या हॉटेलवर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:40 AM2018-12-09T00:40:48+5:302018-12-09T00:41:43+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाने विनापरवाना मद्यपींची सोय करणाऱ्या हॉटेल व धाब्यावर कारवाईच्या मोहिमेत सातत्य ठेवत शुक्रवारी चिंटू सावजी भोजनालय व उमरेडकर सावजी भोजनालय हुडकेश्वर नरसाळा येथे छापे टाकून हॉटेलमालक, व्यवस्थापक आणि मद्यपी अशा नऊ इसमांवर कारवाई केली. निरीक्षक एस.बी. हनवते आणि दुय्यम निरीक्षक प्रशांत येरपुडे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Action on hotels selling alcohol in Nagpur without license | नागपुरात परवान्याविना मद्य विकणाऱ्या हॉटेलवर कारवाई 

नागपुरात परवान्याविना मद्य विकणाऱ्या हॉटेलवर कारवाई 

Next
ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभाग : आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने विनापरवाना मद्यपींची सोय करणाऱ्या हॉटेल व धाब्यावर कारवाईच्या मोहिमेत सातत्य ठेवत शुक्रवारी चिंटू सावजी भोजनालय व उमरेडकर सावजी भोजनालय हुडकेश्वर नरसाळा येथे छापे टाकून हॉटेलमालक, व्यवस्थापक आणि मद्यपी अशा नऊ इसमांवर कारवाई केली. निरीक्षक एस.बी. हनवते आणि दुय्यम निरीक्षक प्रशांत येरपुडे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.
या कारवाईत अरुण रामकृष्ण उमरेडकर (हॉटेलमालक), नितीन गोपाळराव चांदेकर (व्यवस्थापक व मद्यपी), विशाल उमाशंकर शर्मा, आकाश कांतीकुमार दुरुगकर, प्रवीण धनराज पहाडे, आनंद अरुण चौधरी, अभिजित श्रीकांत गुजारे, मंगेश कृष्णराव राऊत, प्रकाश गंगाधर दंडवते इत्यादींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद आणि वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात आली.
मद्यपींची सोय करणाऱ्या हॉटेलवर सक्त कारवाईचे आदेश विभागीय उपायुक्त उषा वर्मा आणि स्वाती काकडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मद्यपींनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नये, असे आवाहन उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी केले आहे. या विशेष मोहिमेबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. या मोहिमेत उपनिरीक्षक रावसाहेब कोरे, भरारी पथकाचे उपनिरीक्षक चितमटवार, कर्मचारी गिरीश देशमुख, अमोल भोसले, आशिष फाटे, वाहनचालक सुभाष शिंदे व रवी निकाळजे आदींनी भाग घेतला.

Web Title: Action on hotels selling alcohol in Nagpur without license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.