नागपुरात खड्ड्यांमुळे होताहेत वाहनचालकांचे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 09:26 PM2018-08-20T21:26:52+5:302018-08-20T21:28:02+5:30

उपराजधानीतील रस्त्यांवर अलीकडच्या काळात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालक उसळून खाली पडत आहेत. वाहन चालकांच्या जीवितासाठी धोका ठरत असलेल्या या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांना रुग्णालयातही पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे वाहनांचे टायर आणि शॉकअप खराब होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. शहरात सुरू असलेल्या विकासकामांसाठी मोठमोठ्या मशिन, मालवाहक वाहनांचे आवागमन आणि जागोजागी खोदकाम यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. यामुळे अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

Accidents happen due to potholes in Nagpur | नागपुरात खड्ड्यांमुळे होताहेत वाहनचालकांचे अपघात

नागपुरात खड्ड्यांमुळे होताहेत वाहनचालकांचे अपघात

Next
ठळक मुद्देवाहनांचेही होत आहे नुकसान


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील रस्त्यांवर अलीकडच्या काळात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालक उसळून खाली पडत आहेत. वाहन चालकांच्या जीवितासाठी धोका ठरत असलेल्या या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांना रुग्णालयातही पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे वाहनांचे टायर आणि शॉकअप खराब होण्याच्या तक्रारी वाढत आहेत.
शहरात सुरू असलेल्या विकासकामांसाठी मोठमोठ्या मशिन, मालवाहक वाहनांचे आवागमन आणि जागोजागी खोदकाम यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. यामुळे अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री १० वाजता मेडिकल चौक ते बैद्यनाथ चौकाकडे दुचाकीने येत असलेली मेडिकलची विद्यार्थिनी खाली पडली. रस्त्यावर टायरच्या आकाराचा नालीसारखा खड्डा असल्यामुळे हा अपघात झाला. असाच खड्डा मानकापूर स्टेडियमच्या आधी गेटच्या समोर आहे. हा खड्डा दुचाकी वाहनांच्या अपघातांसाठी कारणीभूत ठरत आहे. हा रस्ता देशात हाय वे तयार करणाऱ्या ‘एनएचएआय’ने तयार केला आहे. डांबराच्या या रस्त्यावर पॅचवर्क सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले असून ते ओले असताना वाहने त्यावरून गेल्यामुळे येथे छोटी नाली तयार झाली आहे. ‘एनएचएआय’ने असे निकृष्ट दर्जाचे काम मानकापूर अंडरब्रीजमध्येही केले असून तेथील सुरुवातीचा भाग जमिनीत जाऊन खड्डा पडला आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार जीवघेण्या खड्ड्यांची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने सांगितल्यानुसार बैद्यनाथ चौकात रविवारी रात्री ९ वाजता दुचाकीने आपल्या वडिलांसोबत जात असलेल्या एक मुलगी खड्ड्यामुळे जोरात उसळली. यात ती मोठ्या अपघातापासून बालंबाल बचावली. येथे रस्त्याच्या मधोमध नाली खोदली असून त्यावर पाटीही टाकण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी दुचाकी खड्ड्यावरून गेल्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. शहरात पारडी, अमरावती रोड, फ्रेंड्स कॉलनी मार्ग, पोलीस लाईन तलाव ते अवस्थी चौक मार्ग, मंगळवारी बाजार रोड, कामठी रोड, वर्धा रोड, सदर मेन रोड या भागातही हीच अवस्था आहे. रस्त्यांची ही बिकट अवस्था शहरात सर्वत्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत असून या रस्त्यांची डागडुजी होताना मात्र दिसत नाही.

Web Title: Accidents happen due to potholes in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.