नागपूर शहरातील बेपत्ता ५३ मुलामुलींचा शोध लागलेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:51 AM2018-07-19T00:51:12+5:302018-07-19T00:53:17+5:30

नागपूर शहरातून जानेवारी २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत २०१ मुले व ४१७ मुली बेपत्ता झाल्या. यातील १८५ मुले व ३८० मुली मिळाल्या. मात्र १६ मुले व ३७ मुली असे एकूण ५३ मुलामुलींचा शोध लागलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात बुधवारी विधान परिषदेत दिली.

53 missing children have not been found in Nagpur city | नागपूर शहरातील बेपत्ता ५३ मुलामुलींचा शोध लागलेला नाही

नागपूर शहरातील बेपत्ता ५३ मुलामुलींचा शोध लागलेला नाही

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातून जानेवारी २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत २०१ मुले व ४१७ मुली बेपत्ता झाल्या. यातील १८५ मुले व ३८० मुली मिळाल्या. मात्र १६ मुले व ३७ मुली असे एकूण ५३ मुलामुलींचा शोध लागलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात बुधवारी विधान परिषदेत दिली. सदस्य प्रकाश गजभिये यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
बेपत्ता मुला मुलींचा शोध घेण्यासाठी संपूर्ण देशभरात बिनतारी संदेशाद्वारे माहिती प्रसारित करण्यात येते. सायबर सेलच्या माध्यमातून बेपत्ता मुलामुलींचा शोध घेण्यात येतो. तसेच हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशनस्तरावर विशेष मोहीम राबविली जाते. दूरदर्शन, आकाशवाणीच्या माध्यमातून माहिती प्रसारित केली जाते. सोशल मीडियावर माहिती प्रसारित केली जाते.
राज्यात १८ वर्षांखालील हरवलेल्या बालकांच्या बाबतीत माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याची त्वरित दखल घेऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच हरवलेल्या मुलासंबधी तपासाचा कालावधी चार महिन्यापेक्षा अधिक झाला असेल व बालक शोधण्यात यश मिळत नसेल तर असे गुन्हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात यावे, असे आदेश गृह विभागाकडून देण्यात आले आहे. सायबर तक्रार निवारण सी-३ केंद्र, भरोसा सेल, सायबर सेफ्टी असे उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली.

Web Title: 53 missing children have not been found in Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.