नागपूर शहरात ३० दलघमी पाण्याची तूट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 10:34 PM2019-04-26T22:34:41+5:302019-04-26T22:35:29+5:30

शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता २५ ते ३० दलघमी पाणीसाठ्याची तूट पडू शकते. पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी तोतलाडोह धरणातील मृत पाणीसाठ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी शुक्रवारी दिले.

30 decimal water deficit in Nagpur city | नागपूर शहरात ३० दलघमी पाण्याची तूट 

नागपूर शहरात ३० दलघमी पाण्याची तूट 

Next
ठळक मुद्देतोतलाडोह धरणातील मृत साठ्यातील मागितले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता २५ ते ३० दलघमी पाणीसाठ्याची तूट पडू शकते. पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी तोतलाडोह धरणातील मृत पाणीसाठ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी शुक्रवारी दिले.
शहराकरिता पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यासह जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता ज.ग.गवळी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या पाणी वापरानुसार शहराचा पाणीपुरवठा सुरू ठेवल्यास ३० जूनपर्यत २५ ते ३० दलघमी पाण्याची तूट राहील, असे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. जून अखेरची पाण्याची तूट भरून काढण्याकरिता तोतलाडोह जलाशयाच्या मृत साठ्यातून पाणी उपलब्ध करून देता येईल याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.
खिंडसी जलाशयात सध्या ९.९० दलघमी पाणी उपलब्ध आहे. या जलाशयातुन रामटेक शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. दरवर्षी उन्हाळ्यात मोहाडी शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता पेंच डावा कालव्यातून सूर नदीत पाणी सोडण्याची मागणी असते. मोहाडी शहराकरिता पाणी पुरवठा करण्यासाठी जलस्रोत उपलब्ध आहे का किंवा पर्यायी व्यवस्था तपासून बघण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी केली.
वीज केंद्रांना ३० जूनपर्यंत पाणी
कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राकरिता लागणारा पाणीपुरवठा ३० जूनपर्यंत करण्यात यावा. त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: 30 decimal water deficit in Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.